
RSS Sexual Abuse: जगाला सुसंस्कृतपणाचे धडे देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात एका आयटी इंजिनिअरवर RSSच्या स्वयंसेवकांनीच अनेकदा अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यातही धक्कादायक प्रकार म्हणजे संबंधित तरुणानं सततच्या या त्रासामुळं आपलं जीवन संपवलं आहे. पीडित तरुणाच्या सोशल मीडिया पोस्टमुळं हा प्रकार समोर आल्यानं काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी या भडकल्या असून त्यांनी एक मोठी मागणी केली आहे.
आनंदू अजी असं या आयटी प्रोफेशनल तरुणाचं नाव असून मृत्यूपूर्वी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन रा. स्व. संघाच्या शिबिरात वेगवेगळ्या स्वयंसेवकांकडून आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यानं केला आहे. तसंच या प्रकारामुळं मानसिकदृष्ट्या आपण खचलो असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण अशी एकमेव पीडित व्यक्ती नसून देशभरात पसरलेल्या संघाच्या अनेक शिबिरांमध्ये असे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असल्याचं त्यानं आपल्या 'डाईंग डिक्लरेशन'मध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, खासदार प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करुन या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये आनंदू अजी यानं आरोप केला की, आपल्यावर अनेकदा विविध संघ स्वयंसेवकांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्याचबरोबर आपण असे एकमेवर पीडित तरुण नसून अशा प्रकारच्या घटना वारंवर संघाच्या शाखांमध्ये घडत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
जर हे खर असेल तर हे अत्यंत भयानक आहे. त्याचबरोबर प्रियांका गांधी यांनी हा सतर्कतेचा इशाराही दिला की, लाखोंच्या संख्येनं लहान मुलं आणि अल्पवयीन मुलं आरएसएसच्या शिबिरांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळं संघाच्या नेतृत्वानं याबाबत तातडीनं कार्यवाही करणं गरजेचं आहे. मुलांवरील लैंगिक शोषणं हे मुलींच्या होणाऱ्या लैंगिक शोषणा इतकंच व्यापक आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या अमानवीय घटनांवर संघाच्या नेत्यांनी मौन सोडलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या पक्षाचे राज्य सचिव व्ही. के. सनोज यांनी प्रियांका गांधींच्या मागणीला दुजोरा देत म्हटलं की, या प्रकरणात जबाबदार असलेल्यांना कायद्यानुसार जबाबदार धरलं पाहिजे. आनंदूनं ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यानुसार त्यांना संबंधितांना अटक करण्यात यावी. दरम्यान, केरळ पोलिसांनी या आनंदूच्या मृत्यूची चौकशी सुरु केली आहे. तसंच RSSच्या शिबिरांमधील या कथित गैरवर्तनाच्या व्यापक चौकशीची मागमी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून वाढतच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.