Parliament Session Live : संकटमोचकामुळेच काँग्रेस बॅकफुटवर; संसदेत जोरदार हंगामा, नड्डा, रिजिजू तुटून पडले...

DK Shivakumar constitution remarks Lok Sabha ruckus, Rajya Sabha uproar : संसदेचे कामकाज सुरू होताच लोकसभेसह राज्यसभेतही सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
DK Shivakumar
DK ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणावरून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेले विधान काँग्रेसला बॅकफुटवर नेणारे ठरले आहे. आरक्षणासाठी घटनेत बदल केला जाऊ शकतो, या विधानावरून आज संसदेत सत्ताधारी भाजपने जोरदार हंगामा केला. राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि किरण रिजिजू काँग्रेसवर तुटून पडले.

संसदेचे कामकाज सुरू होताच लोकसभेसह राज्यसभेतही सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. राज्यसभेत नड्डा आणि लोकसभेत रिजिजू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. किरण रिजिजू म्हणाले, संविधानानुसार धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही. काँग्रेस नेत्याचे संविधान बदलण्याचे विधान सहन केले जाणार नाही. संविधानिक पदावर बसलेल्या या नेत्याला तातडीने पदावरून हटवायला हवे, असे रिजिजू म्हणाले.

DK Shivakumar
Nagpur Riots News : फडणवीसांच्या दौऱ्यानंतर लगेचच दणका; दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खानचं घर जमीनदोस्त

लोकसभेत गोंधळ सुरू झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला. दक्षिणेत काँग्रेसच्या सरकारने कॉन्ट्रॅक्टमध्ये चार टक्के आरक्षणाचे बिल पारित केले आहे, असे नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले. नड्डा यांनी शिवकुमार यांच्या विधानाचा उल्लेख करत हे खूप गंभीर असल्याचे म्हटले.

हे लोक संविधानाचा रक्षक असल्याचे सांगतात. यावर चर्चा व्हायला हवी. विरोधी पक्षनेत्यांनी याचे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी नड्डांनी केली. रिजिजू यांनीही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना शिवकुमार यांचा राजीनामा घेण्याचे आव्हान दिले. काँग्रेसचे अध्यक्ष इथे बसले आहेत. ते विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडायला हवी. मुस्लिम आरक्षणासाठी ते संविधान का बदलू इच्छितात, हे त्यांनी संपूर्ण देशाला सांगायला हवे. एखाद्या सामान्य व्यक्तीने हे विधान केले असते तर समजू शकलो असतो. एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचे हे विधान आहे, असे रिजिजू म्हणाले.

DK Shivakumar
Kunal Kamra row : कुणाल कामराच्या स्टुडिओला उद्धव ठाकरेंकडून पैसे! निरुपम यांनी फोटो दाखवत केला गंभीर आरोप

खर्गे यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, कोणती व्यक्ती कुणाला म्हणाली की देशाचे संविधान बदलणार आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान कुणीही बदलू शकत नाही. आरक्षणही कुणी संपवू शकत नाही. त्यासाठी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. (सत्ताधारी सदस्यांकडे पाहत) हे भारत तोडणारे आहेत. आरक्षण संपविणारे लोक आहेत, अशी टीका खर्गे यांनी केली. त्यानंतरही गोंधळ थांबत नसल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com