Kunal Kamra row : कुणाल कामराच्या स्टुडिओला उद्धव ठाकरेंकडून पैसे! निरुपम यांनी फोटो दाखवत केला गंभीर आरोप

Uddhav Thackeray news Kunal Kamra studio funding : संजय निरुपम यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
Uddhav Thackeray, Kunal Kamra
Uddhav Thackeray, Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या गाण्यावर राजकारण तापलं आहे. गाण्यामध्ये शिंदे यांच्याविषयी गद्दार असा शब्द वापरल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरावर जोरदार प्रहार करत कारवाईचा इशारा दिला आहे. तर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी काही फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत.

संजय निरुपम यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, कुणाल कामराने उबाठाची सुपारी घेत आमच्या नेत्यांविरोधात एवढा मोठा आरोप केला आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्याचा एक नमुना खारमध्ये काल रात्री दिसला.

Uddhav Thackeray, Kunal Kamra
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा खास मित्र आहे. यापूर्वी हा कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा सदस्य आहे. राहुल गांधींबरोबर फिरतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांसोबतही त्यांच्या भेटीगाठी होतात, असे सांगताना निरुपम यांनी त्यांच्यासोबतचे कामराचे फोटोही दाखवले.

भारतात डावा विचार आता संपला आहे. त्यामध्ये काही बोलबच्चन आहेत, त्यापैकी कामरा एक आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैसे घेत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याबद्दल व्हिडीओ बनवला आहे. ज्या स्टुडिओमध्ये त्याने शुटिंग केले त्यासाठीचा पैसा मातोश्रीतून आला होता. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे दिले होते. त्यांच्याच सांगण्यावरून शिंदेंवर अत्यंत निकृष्ट पातळीवर टीका केली, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Kunal Kamra
Aaditya Thackeray : राज्य घटनेची प्रत दाखवत कुणाल कामराचं शिवसेनेला सडेतोड उत्तर; भ्याड टोळीचा हल्ला, आदित्य ठाकरेही भडकले

जोपर्यंत त्याचे वक्तव्य मागे घेत नाहीत, शिंदेंची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असा इशाराही निरुपम यांनी दिला. सुपारीबाज कुणाल कामराने आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याविषयी गद्दार शब्द उच्चारला आहे. हा जोक नाही, गंभीर आरोप आहे. 2022 मध्ये 40 हून अधिक आमदारांनी उठाव केला, ती गद्दारी नव्हती. गद्दारी तर उध्दव ठाकरेंनी केली होती. हिंदुत्वाच्या विचारांशी, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. भाजपसोबतची युती तोडून काँग्रेसशी आघाडी केली, ती गद्दारी होती, असेही निरुपम यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com