Congress CWC News : वर्किंग कमिटीच्या माध्यमातून काँग्रेसने नाराजांना केले खूश...; शशी थरूर यांनाही संधी

Congress Working Committee News : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पक्षाने विविध राज्यातील नेत्यांना या यादीत स्थान दिल्याचे दिसते.
Mallikarjun Kharge News
Mallikarjun Kharge NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress News : देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी आपली नवीन वर्किग कमिटीची (CWC) स्थापन केली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी कमिटीची नियुक्ती झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पक्षाने विविध राज्यातील नेत्यांना या यादीत स्थान दिल्याचे दिसते. तसेच काही नेत्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला आहे.

सचिन पायलट यांचा 39 सदस्यीय पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी 2020 मध्ये अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात बंड पुकारले होते. मात्र, काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर आनंद शर्मा आणि शशी थरूर यांनाही कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. हे दोघेही काँग्रेसच्या नाराज 23 वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. ज्यांनी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना पत्र लिहून अनेक मुद्दे उपस्थित केले होते. थरूर यांनी नंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकही लढवली होती.

Mallikarjun Kharge News
Yashomati Thakur Appointed On CWC : विदर्भातील आणखी एका नेत्यावर काँग्रेसकडून महत्वपूर्ण जबाबदारी; टीम 'राहुल'मधील यशोमती ठाकुरांचे प्रमोशन

पॅनेलमधील इतर नवोदितांमध्ये दीपा दास मुन्शी आणि सय्यद नसीर हुसेन यांचा समावेश आहे. दास मुन्शी या पश्चिम बंगालचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रियरंजन दासमुन्शी यांच्या पत्नी आहेत. दुसरीकडे, हुसेन हे राज्यसभा सदस्य आहेत, त्यांनी यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया पॅनेलिस्ट म्हणून काम केले आहे.

Mallikarjun Kharge News
Congress CWC News : काँग्रेस लागली कामाला; टीम खर्गे सज्ज : तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी

नवीन समितीमध्ये सचिन पायलट, गौरव गोगोई आणि के पटेल या तरूण नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांचाही समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षाने तयारी केल्याचे बोलले जात आहे. विविध राज्यातील नेत्यांना समितीमध्ये स्थान देण्यात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com