मी सांगितलं म्हणून...! सचिन पायलट यांचा वैभव गेहलोतांविषयी गौप्यस्फोट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Ashok Gehlot, Sachin Pilot, Sachin Pilot on Vaibhav Gehlot
Ashok Gehlot, Sachin Pilot, Sachin Pilot on Vaibhav GehlotSarkarnama

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे पुत्र वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी त्यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निव़डणुकीत (Lok Sabha Election) वैभव यांना तिकीट देण्यामागची कहाणी सांगत पायलट यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. (Sachin Pilot on Vaibhav Gehlot News)

वैभव गेहलोत यांच्यासह 14 जणांवर नाशिक येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण वैभव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याविषयी बोलण्यास पायलट यांनी नकार दिला असला तरी त्यांना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी पायलट पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत. 'वैभव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी त्यावर फारसं काही बोलू इच्छित नाही, असं पायलट यांनी सांगितलं.

Ashok Gehlot, Sachin Pilot, Sachin Pilot on Vaibhav Gehlot
पाटणकर प्रकरणातील चतुर्वेदीनं ईडीला दमवलं; अनेकदा समन्स पाठवलं, यूपीतही शोधलं पण...

वैभव यांच्या तिकीटाविषयी बोलताना पायलट म्हणाले, काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा नकार होता. पण आपण मनधरणी केल्यामुळं त्यांना तिकीट मिळाल्याचं पायलट यांनी सांगितलं. मी त्यावेळी राजस्थान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. अशोक गेहलोत हे आत्ताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट नाकारल्यास त्यांचे खच्चीकरण केल्यासारखे होईल. त्यामुळे पण हायकमांडकडे वैभव यांना तिकीट मिळण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार त्यांना उमेदवारी जाहीर झाली, असं पायलट यांनी स्पष्ट केलं.

तिकीट मिळालं तरी वैभव यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पण दुसरीकडे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलालाही तिकीट मिळालं होतं. ते मात्र विजयी झाले, असं सांगत पायलट यांनी गेहलोत यांना टोला लगावल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. पण त्यांनी या पदाचा राजीनामा देत बंडाचे संकेत दिले होते. अखेर हायकमांडला त्यांना शांत करण्यात यश आल्यानं सरकारवचं संकट टळलं होतं.

Ashok Gehlot, Sachin Pilot, Sachin Pilot on Vaibhav Gehlot
केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसुली; शेलारांच्या मागणीवर वळसे पाटलांची चौकशीची घोषणा

वैभव गेहलोत का आले अडचणीत?

राजस्थान, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये आपल्या ओळखी आहेत. सरकारमधील लोकांच्या माध्यमातून विविध टेंडर मंजुर करून पैसे मिळवून देतो. असे सांगून गुजरात (Gujrat) प्रदेश काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस सुरत येथील सचिनभाई पुरुषोत्तमभाई वेलेरा (Sachinbhai Velora) यांनी सुमारे सात कोटींचा लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत पोलिसांत काँग्रेस नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

वेलोरा यांचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संबंध असुन गेहलोत यांनी वेलोरा यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्याचे छायाचित्र व भेटीचा वृत्तांत गेहलोत यांनी ट्वीट केल्याचा दावा यासंदर्भात तक्रार देणारे सुनील पाटील यांनी केला आहे. वेलोरा यांनी आपली अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा केला होता. त्याने विविध छायाचित्रे देखील दाखवल्याने त्याच्या विश्वास बसला. त्यात त्याने फसवणूक केली. त्यामुळे एकंदरच काँग्रेस नेत्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com