केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसुली; शेलारांच्या मागणीवर वळसे पाटलांची चौकशीची घोषणा

अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात आरोपी असलेल्या IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना सरकारने निलंबित केले आहे.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसुली प्रकरणात आरोपी असलेल्या IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी (Sourabh Tripathi) यांना सरकारने निलंबित केले आहे. त्यावरून बुधवारी विधानसभेत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून शेलार म्हणाले, या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Ashish Shelar
होय, आम्ही गांधी कुटुंबाचे गुलाम! मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदाराचं विधानसभेतच वक्तव्य

महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात मागील आठवड्यात त्रिपाठी यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावावर सही केली आहे.

Ashish Shelar
भाजपच्या दबावामुळं लालूंना ‘एम्स’मध्ये केलं नाही भरती!

काय आहे प्रकरण?

अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसुली (Angadiya Commercial Ransom Case: IPS Saurabh Tripathi police case Filed) प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील ओम वंगाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

प्रा्प्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com