सिध्दूंच्या बालेकिल्ल्याला पडणार खिंडार? बड्या नेत्यानं आव्हान स्वीकारल्यानं अडचणीत

आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे सिध्दूंनी दिलेलं आव्हान बड्या नेत्यानं स्वीकारल्यानं ही लढत हाय व्होल्टेज ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Navjot Singh Sidhu, Bikram Singh Majithia
Navjot Singh Sidhu, Bikram Singh MajithiaSarkarnama
Published on
Updated on

अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीची (Punjab Election 2022) रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत शंख फुंकले आहेत. पण त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) नाराज असल्याची चर्चा आहे. पण मुख्यमंत्रिपदासाठी झगडणाऱ्या सिध्दू यांना बालेकिल्ल्यातच जोरदार आव्हान मिळालं आहे. आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे सिध्दूंनी दिलेलं आव्हान बड्या नेत्यानं स्वीकारल्यानं ही लढत हाय व्होल्टेज ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सिध्दू हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया (Bikram Singh Majithia) यांना आपल्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. मजिठिया यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. त्यांचा मुळचा मतदारसंघ मजिठा हा आहे. या मतदारसंघातून ते दोनदा जिंकले आहे. पण आपला बालेकिल्ला सोडत मजिठिया आता सिध्दूंना टक्कर देणार आहेत. (Punjab Election Update)

Navjot Singh Sidhu, Bikram Singh Majithia
काँग्रेसला धक्का : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरताच बड्या नेत्याची निवडणूक न लढण्याची घोषणा

मजिठिया यांच्या पत्नी आता मजिठा मतदारसंघातून उतरल्या आहेत. मजिठिया यांनी 2007 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे सुखजिंदर राज सिंग यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. शिरोमणी अकाली दलाची सत्ता असताना त्यांच्याकडे जलसंपदा आणि स्वच्छता, माहिती व जनसंपर्क, विज्ञान, उद्योग, पर्यावरण आदी खाती होती.

अमृतसर पूर्व हा सिध्दू यांचा बालेकिल्ला मानला जातो. अमृतसर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. तर 2017 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास 43 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित मानला जातो. पण मजिठिया यांना आव्हान देत सिध्दूंनी स्वत:चा विजय अवघड केल्याचे मानले जात आहे.

Navjot Singh Sidhu, Bikram Singh Majithia
भाजपला खिंडार पडणार? दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

मजिठिया यांना टक्कर देणं सिध्दू यांना सोपं नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मागील काही महिन्यांत सिध्दू आपल्या मतदारसंघात खूप कमी आले आहे. अनेकदा वादही निर्माण झाल्याने त्याचा त्यांना होणाऱ्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. शिरोमणी अकाली दलाचा मतदारही याठिकाणी चांगला आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत अटीतटीची होऊ शकते. मागील निवडणुकीप्रमाणे सिध्दूंना सहज विजय मिळणार नाही, असं जाणकारांचं मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com