Samajwadi Party : समाजवादी पक्षाची आणखी एका राज्यात एन्ट्री; इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढणार?

Samajwadi Party in Goa Politics : समाजवादी पक्षाची आता राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या निवडीमुळे अखिलेश यादव यांनी एक मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Goa News: देशात 2024 हे निवडणुकींचे वर्ष ठरले. 2027 च्या विधानसभा निवडणुकींची तयारी काही पक्षांनी आता पासूनच सुरु केली आहे. 2027 मध्ये उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता समाजवादी पक्षाने आता गोव्यात एन्ट्री घेतली आहे.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे विश्वासू मनीष अग्रवाल यांना 'सपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी बनवले आहे. समाजवादी पक्षाची आता राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या निवडीमुळे अखिलेश यादव यांनी एक मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

गोव्यात सध्या बाजपची सत्ता आहे, सपाच्या (Samajwadi Party) गोव्यातील एन्ट्रीने गोव्यातील काँग्रेसला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गोव्यात आम आदमी पक्षाचे दोन आमदार आहेत. तर काँग्रेस आणि भाजप या पक्षांचे नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सत्तेत आहेत

Akhilesh Yadav
Nitin Gadkari : अमित शहांनंतर आता नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेसचे नेते का झाले आक्रमक?

गोवा राज्य मुंबईनंतर वेगाने विकसित होणार राज्य आहे. गोव्यात आर्थिक घडामोडी वेगाने वाढत आहेत आणि मनीष जगन अग्रवाल यांचे बिझनेस असेंब्लीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सपासाठी हे नवी इनिंग नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

गोव्यात (Goa) विधानसभेच्या 40 जागा आहेत. या छोट्या राज्यात अनेक पक्ष आपले नशीब आजमावत आहेत. आम आदमी पार्टी त्यानंतर तृणमूल काँग्रेसने गोव्यात आल्यानंतर अखिलेश यादव यांनी देखील गोव्यात आपला कमांडर उतरवला आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत सपा आपले नशीब आजमवणार आहे. यात पक्षाला किती यश मिळेल हे वेळच सांगू शकेल.

Akhilesh Yadav
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांची खासदारकी अडचणीत; भाजपकडून हायकोर्टात आव्हान

दरम्यान, समाजवादी पक्षाची गोव्यात एन्ट्री झाल्याने राज्यातील सत्ताधारी पक्षाचे टेन्शन वाढवणार आहे. तसेच, राज्यात इंडिया आघाडीत सपा सहभागी झाल्यास आघाडीतील पक्षांचे देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेतील 40 जागांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील बदलण्याची शक्यता आहे. आता पुढे काय होते हे येणारी वेळचं ठरवेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com