Nitin Gadkari : अमित शहांनंतर आता नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेसचे नेते का झाले आक्रमक?

NHAI Road Accident : जयपूर-अजमेर हायवेवर नुकत्याच झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Nitin Gadkari, Congress
Nitin Gadkari, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरून संसदेत बराच गदारोळही झाला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. प्रामुख्याने राजस्थानातील काँग्रेस नेत्यांनी गडकरींवर निशाणा साधला आहे.

गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यामागचे कारण म्हणजे जयपूर-अजमेर हायवेवर झालेला अपघात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला गडकरी यांचे मंत्रालय आणि टोल कंपनी जबाबदारी असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Nitin Gadkari, Congress
Mahayuti Government : मंत्रालयातील दालनासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; पालकमंत्रीपदावरून रुसवेफुगवे वाढले

राजस्थानातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री प्रताप सिंह खचारियावास यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI आणि टोल कंपनीला दोषी धरले आहे. एनएचएआय हा देशातील सर्वात भ्रष्टाचार विभाग असून या 13 जणांचा बळी या भ्रष्टाचारी यंत्रणेनेच घेतल्याचा संताप माजी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

टोलवसुलीच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा करूनही कंपनीला हायवेचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच सुरक्षेबाबत दक्षताही घेण्यात आलेली नाही. गडकरी हे या टोल कंपन्यांच्या बाजूने असल्याचा आरोप खचारियावास यांनी केला आहे. टोल कंपनी आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना तातडीने अटक करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Nitin Gadkari, Congress
Wagholi Accident : अमरावतीहून पुण्यात आलेल्या कामगारांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 जणांचा चिरडून मृत्यू

जयपूर-दिल्ली हायवेची 2014 मध्ये गडकरी यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली होती. सहा महिन्यांत दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण अजूनही हायवे असुरक्षित असून भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचे खचारियावास यांनी सांगितले. अपघाताली मृतांच्या कुटुंबियांना तात़डीने एक कोटींची मदत आणि एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com