Gyanesh Kumar : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची वर्णी, PM मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजूरी

Who is Gyanesh Kumar : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार हे आता देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार हे आता भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत.
Gyanesh Kumar
Gyanesh KumarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News, 18 Feb : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) हे आता देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार हे आता भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत.

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिल्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाकडून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता.17) रात्री काढण्यात आला आहे.

Gyanesh Kumar
Sanjay Raut on Kejriwal Congress Deal: केजरीवाल काँग्रेससोबत मिळून निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते, मात्र कसा बिघडला खेळ?

ते 26 जानेवारी 2029 पर्यंत या पदाचा कारभार सांभाळणार आहेत. ज्ञानेश कुमार या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका (Bihar Assembly Election) तर पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल, आसाम आणि तामिळनाडूच्या निवडणुकांवर देखरेख करतील.

Gyanesh Kumar
Kolhapur Boundary Expansion : निवडणुकीच्या घोळात कोल्हापूरची हद्दवाढ रखडणार? लोकप्रतिनिधींचा हट्टाहास नडणार!

1988 च्या बॅचचे केरळ केडरचे आयईएस अधिकारी असलेल्या ज्ञानेश कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं आहे. त्यांनी राम मंदिर निर्माण समितीवर देखील काम केलं आहे. तर जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कुमार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com