Mumbai News : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी आता काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत देत आपल्या एक्स हँडलवरील पक्षाचे नाव हटवले आहे. त्यामुळे वडिलांपाठोपाठ तेही राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यांनी गुरुवारी राहुल गांधींच्या टीमवर सडकून टीका केली. (Zeeshan Siddique News)
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतील एक किस्सा झिशान यांनी मीडियाशी बोलताना सांगितला. राहुल गांधींच्या टीममधील एका टीमने झिशान यांना सांगितले होते की, राहुल यांना भेटायचे असले तर आधी दहा किलो वजन कमी करावे लागेल. त्यानंतर त्यांची भेट घडवली जाईल, असा दावा झिशान यांनी केला आहे. ही यात्रा नांदेडमध्ये असतानाचा हा किस्सा आहे. मी एक आमदार, मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष असतानाही असे बोलले गेल्याने झिशान यांनी नाराजी व्यक्त केली.
सिद्दिकी म्हणाले, राहुल गांधी हे चांगले नेते आहेत. ते आपले काम करत असतात. मल्लिकार्जुन खर्गे मला वडिलांसमान आहेत, पण त्यांचे हात कधीकधी बांधलेले असतात. राहुल गांधींच्या सोबत जे लोक आहेत, ते पक्षाचे नुकसान करत आहेत. असे वाटते की या लोकांना काँग्रेसला (Congress) संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षाने सुपारी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधी यांची टीम भ्रष्ट आहे. ते चांगले असले तरी त्यांना हे समजत नाही की, त्यांची टीम असभ्य आहे. ज्याप्रकारे पक्षाचे काम सुरू आहे, त्यामुळे मला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. मी मागील आठवड्यापर्यंत काँग्रेसमध्येच असल्याचे सांगत होतो, पण काँग्रेसला अल्पसंख्याकांची गरज नाही, असे वाटते. आमची गरज उरली नाही. हे खूप दुर्दैवी आहे, अशी टीका झिशान यांनी केली.
मुख्यमंत्री सरमांचा टोला
झिशान यांच्या भारत जोडो यात्रेतील अनुभवाचा उल्लेख करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांचे नाव न घेता सरमा यांनी एक्स हँडलवर पोस्ट केली आहे की, ‘पक्षातील कार्यकर्त्यांनी फोटोजेनिक आणि चांगले दिसावे, अशी हास्यास्पद मागणी करू शकणारा एकच व्यक्ती माझ्यासमोर येतो तो उत्तर कोरियावर राज्य करणारा शाही घराण्यातील व्यक्ती.’ सरमा यांच्याकडून सातत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.