Kolhapur Politics : नेत्यांनंतर आता शिलेदारांची वेळ; महापालिका, झेडपी इच्छूकही घेणार सोईस्कर भूमिका!

Kolhapur Local Body Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती विजयी झाले. काँग्रेसला अधिक बळ मिळाल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदेत इच्छुक असणाऱ्यांनी चाचणी करून मोर्चेबांधणी केली. मात्र, विधानसभा निकालानंतर त्यांच्या स्वप्नाला सुरुंग लागला.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 09 December : मागील पाच वर्षांत ज्या आमदारांना निवडून दिले, त्या आमदारांनी अडीच वर्षांच्या काळात सोईस्कर भूमिका घेत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याच शिलेदारांनी आगामी कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोईस्कर भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘जो पक्ष उमेदवारी देईल, तोच आपला नेता’ अशी भूमिका खासगीत बोलताना दिसत आहेत.

लोकसभेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तारले, तर विधानसभेला महायुती भक्कम झाली आहे. या दोन झटक्यातून सावरून अनेक इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे. या अनपेक्षित निकालामुळे पक्ष आणि नेता ठरवण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे, त्यामुळे इच्छुकांच्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. जिंकण्याची क्षमता असणारे इच्छुक आपल्या बाजूला कसे येतील, यासाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीही बोलणी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती भरघोस मतांनी विजयी झाले. काँग्रेसला अधिक बळ मिळाल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदेत इच्छुक असणाऱ्यांनी चाचणी करून मोर्चेबांधणी केली. मात्र, विधानसभा निकालानंतर त्यांच्या स्वप्नाला सुरुंग लागला.

महायुतीला (Mahayuti) भरघोस यश मिळाल्यानंतर काहींसाठी पूरक तर काही जणांसाठी राजकीय अस्वस्था करणारा निकाल लागला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहींची परिस्थिती अवघड बनली आहे. तर काहींना विजयाचा आत्मविश्वास आला आहे.

Local Body Election
Jayant Patil : सासऱ्यांच्या सल्ल्यानेच नार्वेकरांना अध्यक्ष केलंय; जयंतरावांच्या खुमासदार भाषणाला फडणवीसांची फोडणी!

महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी करत असताना विधानसभा निवडणुकीने सर्वत्र राजकीय चित्र बदलले आहे. विधानसभा निवडणुकीत महापालिका क्षेत्रात थेट नेत्यांच्या आदेशा विरोधातच घोषित बंड केल्याने त्याचा परिणाम कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दिसून आला आहे. बऱ्याच माजी नगरसेवकांनी आपल्या नेत्याचा आणि पक्षाचा आदेश डावलून विरोधी उमेदवाराचा उघड प्रचार केला, तर काहीजणांनी पडद्यामागची भूमिका घेतली.

विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याने आता माजी नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोईस्कर भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. नेत्यांचा आदेश डावल्याने कारवाईची कुणकुण अनेकांना लागली आहे, त्यामुळे हे नगरसेवक काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Local Body Election
Ajit Pawar : आपला करेक्ट कार्यक्रम झालाय, हे लक्षात घ्या... तेव्हा कसं गारगार वाटायचं; अजितदादांची जोरदार टोलेबाजी

अनेकांनी जो पक्ष उमेदवारी देईल, तो नेता आपला, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, मंत्री कोण होणार यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यातच महापालिकेला बहुप्रभाग रचना झाली तर स्थानिक समीकरणे पाहूनही पक्षांतर केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com