लोकसभा निवडणुकीत '45 पार'चा नारा दिलेल्या महायुतीचा गाडा 17 जागांवर थांबला. 2019 मध्ये दोन अंकी म्हणजे 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024 ला फक्त 9 ठिकाणी विजय मिळाला आहे. लोकसभेला सपाटून मार खालल्यानंतर विधानसभेला सुद्धा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत शंभरी ओलांडत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यातच अंतर्गत सर्व्हेनं भाजपचं ( Bjp ) 'टेन्शन' वाढलं आहे. 2024 मधील लोकसभेनंतर विधानसभेलाही भाजपचं मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे.
2014 मध्ये स्वबळावर लढत भाजपला राज्यात 122 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019 मध्ये शिवसेनेसोबत ( Shivsena ) युतीत लढलेल्या भाजपनं 105 जागांपर्यंत मजल मारली होती. पण, यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला फक्त 55 ते 65 जागा मिळू शकतात. या सर्व्हेनंतर भाजपचे 'टेन्शन' नक्कीच वाढलं आहे. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं याबाबत वृत्त दिलं आहे.
लोकसभेला दणका, विधानसभेसाठी काय पावले?
भाजपच्या 'अब की बार, 400 पार'च्या घोषणेमुळे मतदारांमध्ये भीती होती. 400 हून अधिक जागा मिळविल्यास भाजप घटनात्मक बदल करेल, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. त्यासह मराठा आरक्षण, 'जरांगे फॅक्टर'चाही फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला. पण, विधानसभेला सुद्धा ही भीती असून भाजपकडून सावध पावली टाकली जात आहेत. त्यासाठी 'लाडकी बहीण योजना' आणि 'लाडका भाऊ'सारख्या योजना लागू करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे मतदानात किती रूपांतर होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली...
लोकसभेला 4 जागा लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे अजितदादा ( Ajit Pawar ) गटातील अनेक आमदार विधानसभेपूर्वी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यासह अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे भाजपची 'ब्रँड व्हॅल्यू' कमी झाली, असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर मुखपत्रातून कानपिचक्या देण्यात आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.