Suvendu Adhikari Narada Sting : शुभेंदू अधिकारींचा 2014चा Video पुन्हा Viral! संजय राऊतांनी Narada Stingची उकरली जुनी फाइल

ShivSena UBT MP Sanjay Raut reshared 2014 Narada sting operation video featuring Suvendu Adhikari TMC, reigniting political controversy West Bengal : पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असलेले शुभेंदू अधिकारी यांचे 2014 मध्ये लाचेचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
Suvendu Adhikari Narada Sting
Suvendu Adhikari Narada StingSarkarnama
Published on
Updated on

West Bengal political controversy : पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करत, भाजपने तिथं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. शुभेंदू अधिकारी यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधिमंडळ नेते जाहीर केलं आहे. याचबरोबर शुभेंदू अधिकारी थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत आहेत.

त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, 2014मधील तहलका मॅगझिनने पश्चिम बंगालमध्ये राबवलेल्या नारदा स्टिंग आॅपरेशनचा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करत, शुभेंदू अधिकारी यांच्या जुन्या प्रकरणाची जखम ताजी केली.

2014 मध्ये तहलका मॅगझिनेने नारदा स्टिंग आॅपरेशन राबवले होते. या आॅपरेशनचा व्हिडिओ पुन्हा एकदा शिवसेना संजय राऊत यांनी त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे (TMC) अनेक नेते, लाच घेताना या आॅपरेशनमध्ये अडकले होते. त्यात शुभेंदू अधिकारी देखील होते.

Suvendu Adhikari Narada Sting
Sex Determination Case : महाराष्ट्र हादरवणारं गर्भलिंग निदान रॅकेट! 12वी शिकलेल्याकडून चाचण्या, गोठ्यापासून धावत्या कारपर्यंत ‘सेटअप’, IMA डॉक्टरसह 12 जण अटकेत, शेकडो गर्भपात

पश्चिम बंगलामधील (West Bengal) 2016च्या निवडणुकीत या व्हिडिओ मोठ्याप्रमाणात भाजपकडून प्रमोट करण्यात आला होता. यातच, सीबीआयने या लाचप्रकरणात पुढे दोन मंत्री, एक आमदार आणि माजी मंत्री, अशा चौघांना अटक केली. पण शुभेंदू अधिकारी यांना अटक केली नाही.

Suvendu Adhikari Narada Sting
Muslim house denial case : मुस्लिम असल्याने घर नाकारलं; धार्मिक भेदभावाचा आरोप, AIMIM शहराध्यक्षांनी ठोकली पोलिसांत तक्रार

शुभेंदू अधिकारी पुढे लगेचच भाजपमध्ये सहभागी झाले. या लाच प्रकरणामध्ये काहींवर कारवाई झाली, पण शुभेंदू अधिकारी यांना कारवाईतून डावलण्यात आले, यावर आॅपरेशन राबवणाऱ्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नाराजी व्यक्ती केली. कायद्यासमोर सर्व समान असतात, शुभेंदू अधिकारी यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल नुकताच दिली.

हेच प्रकरण मुख्यमंत्रीपदावर शुभेंदू अधिकारी विराजमान होत असतानाच, पुन्हा ताजं करण्यात आलं आहे. खासदार सजंय राऊत यांनी या लाच आॅपरेशनचा शुभेंदू अधिकारी यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. केंद्रातील भाजपला एकप्रकारे आव्हान दिलं आहे.

शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर, भाजपने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृती चॅनेलवरून हटवल्याची देखील आठवण संजय राऊत यांनी करून दिली आहे. आता हा महात्मा बीजेपीचा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री झाला आहे, आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे. कसली नैतिकता अन् कसला सिद्धांत, असे म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com