फडणवीसांनी '१५ लाखांचा' पुरावा मागितला, सत्यजित तांबेनी तो व्हिडीओच समोर आणला...

15 Lakhs Controversy : नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी
Satyajit Tambe on 15 Lakhs Controversy

Satyajit Tambe on 15 Lakhs Controversy

Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आज हिवाळी अधिवेशनात वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानसभेत यांनी उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या १५ लाख (15 Lakhs Controversy) रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हान फडणवीस यांनी दिलं. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) राऊतांच्या मदतीसाठी धावून आले.

जाधव म्हणाले होते की, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. २०१४ पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने की, कहा रखने का,' असे मोदी म्हणाले होते. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यानंतर विरोधकांनी भास्कर जाधव यांच्या माफीसाठी सभागृहात गदारोळ घातला, त्यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले.

<div class="paragraphs"><p>Satyajit Tambe on&nbsp;15 Lakhs Controversy</p></div>
अजितदादा स्टॅम्पवर लिहून देतो म्हणाले, तरीही पंतप्रधानांनी विचारले "उद्धवजी सेशन में आऐंगे?"

पण देवेंद्र फडणवीस यांनी मागितलेल्या पुराव्याची पुर्तता केली ती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणााचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला, यामध्ये ते १५ लाख रुपयांचा उल्लेख करत असल्याचे सांगितले. ते यावेळी म्हणाले, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला हवा असलेला व्हिडिओ मी शेअर करतोय, आपण आवर्जून पहा व शेअर करायला विसरु नका! #जनहितार्थ_जारी.

भास्कर जाधव यांची माफी

विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून जाधव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, १५ लाख रुपये पंतप्रधान असे कधी बोलले नाही. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही. एका उमेदवाराची नक्कल केली आहे, असे म्हटले. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून जाधव यांनी अंगविक्षेप व शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. जाधव यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफीही मागितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com