अजितदादा स्टॅम्पवर लिहून देतो म्हणाले, तरीही पंतप्रधानांनी विचारले "उद्धवजी सेशन में आऐंगे?"

Winter Session 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या आजारपणातून बरे होत आहेत.
Uddhav Thackeray-narendra modi-ajit pawar in Winter Session 2021

Uddhav Thackeray-narendra modi-ajit pawar in Winter Session 2021

Sarkarnama

Published on
Updated on

दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या आजारपणातून बरे होत आहेत. त्यामुळे ते विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार की नाही यावर सध्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरु आहे. अशातच काल अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर भाष्य केले. पत्रकारांनी त्यांना वारंवार मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का, अशी विचारणा केली. त्यावर ते त्यांच्या सोयीने विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

मात्र या स्पष्टतेनंतरही वेगवेगळ्या मार्गांनी त्याच आशयाचे प्रश्न येत राहिले, अखेरीस वैतागून अजित पवार यांनी मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार आहेत, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा प्रतिसवाल पत्रकारांना केला. त्यावर एकच हशा पिकला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता त्यांच्या सोयीने अधिवेशनात येणार आहेत हे तर स्पष्ट आहे. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना खासदारांकडे उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबद्दल आणि अधिवेशनातील उपस्थितीबद्दल विचारपूस केली.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray-narendra modi-ajit pawar in Winter Session 2021</p></div>
मुनगंटीवार संतापले अन् म्हणाले, त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो!

पंतप्रधान मोदी यांनी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्याकडे उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. ते म्हणाले, “विनायकजी, कैसी है उद्धवजी की तबियत...?" आज सेशन में जाऐंगे क्या? अजित पवार का बयान सुना, बोल रहे थे की उद्धवजी सेशन में आऐंगे. त्यावर विनायक राऊत यांनी अगदी सकारात्मक उत्तर देत मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्मत असल्याचे सांगितले. मात्र अजितदादांच्या उद्धव ठाकरे अधिवेशनात येणार आहेत हे वक्तव्य पंतप्रधानांपर्यंत पोहचले हे नक्की.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray-narendra modi-ajit pawar in Winter Session 2021</p></div>
भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केली अन् फडणवीस भडकले

दरम्यान आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस भरती प्रक्रियेतील मुद्दे, पेपर फूटी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, मोदींच्या नकलेचा मुद्दा, १२ आमदारांचे निलंबन, विजबील अशा विविध मुद्द्यावर गाजला. यावर नाना पटोले, नितीन राऊत, भास्कर जाधव, एकनाथ शिंदे, राजेश टोपे यांनी जोरदार बॅटिंग केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com