CBI Case : बड्या नेत्यासमोर CBI हतबल; 4 वर्षे तपास, पण एकही पुरावा नाही, कोर्टाने केस केली बंद

CBI’s investigation and findings : दिल्ली सरकारच्या व्हिजिलन्स विभागाने 2019 मध्ये जैन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. आज सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील कोर्टाने मंजूर केला आहे.
CBI
CBISarkarnama
Published on
Updated on

PWD recruitment allegations : केंद्रीय तपास यंत्रणांकडून कोणतेही ठोस पुरावे नसताना नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात. त्यांना अटकही होते, असे आरोप विरोधी पक्ष करत असतात. काही वेळा सुप्रीम कोर्टानेही त्यावर भाष्य केले आहे. असेच एक प्रकरण आता समोर आले आहे. दिल्लीतील बड्या नेत्याविरोधात चार वर्षांपूर्वी सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पण एकही पुरावा न मिळाल्याने कोर्टाने ही केस बंद केली आहे.

दिल्ली सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने जैन यांच्यासह अधिकारऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराची केस बंद केली आहे. याबाबत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला होता. हा रिपोर्ट कोर्टाने सोमवारी मंजूर केला आहे.

दिल्ली सरकारच्या व्हिजिलन्स विभागाने 2019 मध्ये जैन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. आज सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट मंजूर करताना कोर्ट म्हणाले की, अनेक वर्षे तपास करूनही कुणाविरोधातही आरोपांचे समर्थन करणारा एकही पुरावा मिळालेला नाही. गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचे संकेत देणारे पुरावेही उपलब्ध नाहीत. याप्रकरणी करण्यात आलेले आरोप आणि सादर करण्यात आलेली तथ्य पुढील कार्यवाही सुरू ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत.

CBI
सचिन तेंडूलकरची लेक सारा बनली तब्बल 1137 कोटींच्या सरकारी मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

आरोप करण्यासाठी केवळ संशय पुरेसा नाही, पुढे जाण्यासाठी किमान ठोस पुरावे हवेत, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. दरम्यान हे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागातील भरतीशी संबंधित आहे. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप सीबीआयने केला होता. दिल्ली सरकारच्या व्हिजिलन्स विभागाने 29 जुलै 2019 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयनेही चौकशी सुरू केली होती.

CBI
Rahul Gandhi : खरे भारतीय असे बोलणार नाहीत! सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना जोरदार झटका

सत्येंद्र जैन यांना दिलासा मिळाल्यानंतर दिल्ली आपचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी आनंद व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, केंद्र सरकार आणि सीबीआयचे खोटे गुन्हे आता कोर्टात तोंडावर पडत आहेत. अशाच एका प्रकरणात अनेक वर्षे तपास करून सीबीआयला कोणताही भ्रष्टाचार आढळून आला नाही. आज कोर्टाने केस बंद केली. आज भाजपने जैन आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागायला हवी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com