Central Govt : 18 माजी मंत्र्यांसह 12 खासदारांची सुरक्षा काढली जाणार, पोलिसांनी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात 'या' नावांचा समावेश

Delhi Police security report 2024 : देशभरातली नेते आणि खासदाराना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जातो. अशातच आता दिल्ली पोलिसांनी या नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार केला आहे.
Security of Central Govt
Security of Central GovtSarkarnama
Published on
Updated on

Security of Central Govt : देशभरातली नेते आणि खासदाराना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जातो. अशातच आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार केला आहे.

या अहवालात 30 माजी मंत्री आणि खासदारांची सुरक्षा काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आपला अहवाल गृहमंत्रालयाकडे (Ministry of Home Affairs) पाठवणार आहेत. या अहवालात 18 माजी राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची सुरक्षा काढण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तसेच या नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा गृहमंत्रालयाने निर्णय घ्यावा असंही दिल्ली पोलिसांकडून सांगितलं जाणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) राज्यमंत्री आणि खासदारांना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर अनेकांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आली.

तर काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक वर्षांपासून ऑडिट झालं नव्हतं, शिवाय सुरक्षा व्यवस्थेची पुनर्विचार न करण्याची काही विशेष कारणे असू शकतात, असंही सुत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाकडून मागील काही महिन्यांपूर्वी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये अनेक नेत्यांना सुरक्षा पुरवली जात आहे.

Security of Central Govt
Walmik Karad : "वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो" वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "काल विश्वसनीय अधिकाऱ्याने..."

पोलिसांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये कोणाची नावे?

मात्र, त्याचा आढावा घेतला गेला नसल्याचं समोर आलं होतं. शिवाय अनेक माजी राज्यमंत्री, माजी खासदार यांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरीही त्यांना सुरक्षा दिली जात असल्याचं उघडकीस आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या (Police) सुरक्षा विभागाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये Y-श्रेणीची सुरक्षा मिळालेले माजी राज्यमंत्री भागवत किशनराव कराड.

Security of Central Govt
Walmik karad : वाल्मिक कराडप्रकरणावरून केंद्रीय मंत्र्याचा फडणवीसांना घरचा आहेर; म्हणाले... 'एवढा वेळ'

जसवंतसिंह भाभोर, जॉन बारला, देवुसिंह चौहान, भानु प्रताप सिंह वर्मा, कौशल किशोर, कृष्णा राज, मनीष तिवारी, पीपी चौधरी, एसएस अहलूवालिया,राजकुमार रंजन सिंह, रामेश्वर तेली, संजीव कुमार बालियान, सोम प्रकाश, माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के सिंह आणि विजय गोयल, सुदर्शन भगत, व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com