Big Fight : 'या' आठ मंत्र्यांसह दोन माजी मुख्यमंत्र्यांचं भवितव्य 'EVM'मध्ये कैद

First Phase Election : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत दिग्गज नेत्यांना आज मतदान करण्यात आले. त्यामुळे आता मतमोजणी होईस्तोवर या नेत्यांची चलबिचल मात्र सुरु राहणार आहे.
Voting
VotingSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान त्रिपुरा मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान बिहार मध्ये झाल्याचे चित्र आहे. देशात लोकसभा निवडणुकीत कुठलीही मोठी अप्रिय घटना निवडणुकीत झाली नाही. काही वेळेसाठी ईव्हिएम बंद पडणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे यामुळे मतदान प्रक्रिया बाधित झाली. पण, त्या व्यतिरिक्त कुठे ही मोठी अडचण पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या वेळी झाली नाही. पहिल्या टप्प्यात अगदी दिग्गज नेते रिंगणात होते. त्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे चित्र संपुर्ण देशभरात आहे. विद्यमान केंद्रिय मंत्री, राष्ट्रीय नेते यांच्या निवडणुक निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष आहे.

अंदमान निकोबार 56.87 टक्के, अरुणाचल प्रदेश 66.21 टक्के, आसाम 71.56, टक्के, बिहार 47.74 टक्के, छत्तीसगड 63.41 टक्के, जम्मु काश्मीर 65.08 टक्के, लक्षद्विप 59.02 टक्के, मध्य प्रदेश 63.50 टक्के, महाराष्ट्र 55.35 टक्के, मणिपूर 68.81 टक्के, मेघालय 73.69 टक्के, मिझोराम 54.23 टक्के, नागालँड 56.91 टक्के, पाँडेचरी 73.37 टक्के, राजस्थान 52.38 टक्के, तामिलनाडू 62.32 टक्के, त्रिपुरा 80.06 टक्के, उत्तर प्रदेश 57.90 टक्के, पश्चिम बंगाल 77.57 टक्के, उत्तराखंड 53.77 टक्के, सिक्कीम 68.06 टक्के मतदान झाले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Voting
Lok Sabha Election 2024 : बंगाली मतदार कुणाला देणार धक्का? देशात सर्वाधिक मतदान... जाणून घ्या इतर राज्यांची स्थिती

मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या लोकसभा मतदार संघात निवडणुक झाली. भाजप आणि काँग्रेससाठी हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. त्याच बरोबर डीएमके साठी देखील निवडणुकीचा हा टप्पा अतिशय महत्वाचा होता. बिहार मध्ये सर्वात कमी आणि त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदानामुळे लोकसभा निवडणुक चांगलीच गाजली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला. देशभरातील 102 जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य ईव्हिएम मध्ये कैद झाले आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर मतदान झाले.भाजप आणि काँग्रेससाठी हा टप्पा अतिशय महत्वाचा होता.

मतदान होणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये नितीन गडकरी (नागपूर) यांच्या सोबत के अन्नामलाई (कोयंबटूर), जितिन प्रसाद (पीलीभीत), जीतन राम मांझी (गया), कोट्याधीश उमेदवार नकुल नाथ (छिंदवाड़ा), गौरव गोगोई (जोरहाट), इमरान मसूद (सहारनपुर), कार्ति चिदम्बरम (शिवगंगा), तमिलिसाई साउंडराजन (चेन्नई दक्षिण), दयानिधि मारन (चेन्नई सेंट्रल), अर्जुनराम मेघवाल (बीकानेर), भूपेंद्र यादव (अलवर सीट), संजीव बालियान (मुजफ्फरनगर), किरेन रिजिजू (अरुणाचल पश्चिम-अरुणाचल प्रदेश), निसिथ प्रमाणिक (कूचबिहार) यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ईशान्येकडील सहा राज्ये आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या 9 जागा आहेत. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सर्व 39 जागा आहेत. लक्षद्वीपमध्ये 1 जागा आहे. अरुणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, आसाममधून 4, छत्तीसगडमधून 1, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 5, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2, मिझोराममधून 1, नागालँडमधून 1, राजस्थानमधून 12, सिक्कीममधून 1, त्रिपुराच्या 1, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3, तामिळनाडूच्या 39, अंदमान आणि निकोबारच्या 1, जम्मू-काश्मीरच्या 1, लक्षद्वीपच्या 1 आणि पाँडेचरीच्या 1 जागेवर मतदान होत आहे.

Voting
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला मत देऊन वाया घालवू नका! ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com