Election Commission
Election CommissionSarkarnama

Lok Sabha Election 2024 : बंगाली मतदार कुणाला देणार धक्का? देशात सर्वाधिक मतदान... जाणून घ्या इतर राज्यांची स्थिती

West Bengal News : पश्चिम बंगालमधील तीन जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 77.57 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हा आकडा सायंकाळी सहा वाजेपर्यंत 80 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो.

New Delhi News : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांवर अजूनही मतदारांच्या रांगा असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात सरासरी 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे दिसते. यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान झाले होते.

लोकसभेच्या 102 जागांसाठी देशात मतदान सुरू आहे. सर्वाधिक 39 जागा तमिळनाडूमध्ये असून इथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत 62.02 टक्के मतदान झाले आहे, तर पश्चिम बंगालमधील (West Bengal) तीन जागांसाठी 77.57 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Election Commission
Lok Sabha Election News : मतदानादिवशीच भाजपला झटका; कमलनाथ यांच्या शिलेदाराची घरवापसी

देशातील 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरू आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर अनेक मतदान केंद्रांवर अजूनही गर्दी आहे. त्यामुळे मतदानाची (Voting) आकडेवारी येण्यास विलंब लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागालँडमध्ये सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

नागालँडमध्ये एका लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील ईस्टर्न नागालँड (Nagaland) पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. राज्यात विधानसभेच्या जवळपास 20 मतदारसंघांमध्ये बहिष्काराचा परिणाम जाणवत आहे. जवळपास सहा जिल्ह्यांतील शून्य टक्के मतदान झाले आहे.

कुणाचे वर्चस्व?

2019 मध्ये 102 जागांपैकी 45 जागा यूपीएने जिंकल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक 38 जागा या एकट्या तमिळनाडूतील होत्या. या वेळी पहिल्या टप्प्यातच तमिळनाडूतील मतदान पार पडले आहे, तर मागील निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. या वेळीही अशीच स्थिती राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही राज्यांत झालेले मतदान

पश्चिम बंगाल – 77.57 टक्के

उत्तर प्रदेश - 57.54 टक्के

राजस्थान - 50.27 टक्के

महाराष्ट्र - 54.85 टक्के

बिहार – 46.32 टक्के

मध्य प्रदेश – 63.25 टक्के

छत्तीसगड – 63.41 टक्के

आसाम – 70.77 टक्के

अरुणाचल प्रदेश – 63.26 टक्के

R

Election Commission
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला मत देऊन वाया घालवू नका! ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com