Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला मत देऊन वाया घालवू नका! ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamata Banerjee News : प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका केली. देशभरात इंडिया आघाडी एकसंध असताना बंगालमध्ये मात्र ममतांकडून टीका केली जात आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

West Bengal News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election 2024 ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर सडकून टीका केली. बंगालमध्ये मी इंडिया आघाडी बनवली होती, पण आता या पक्षांना मतं देऊन ते वाया घालवू नका, असे आवाहन ममतांनी मतदारांना केले आहे. हे पक्ष भाजपसाठी काम करत असल्याची टीकाही ममतांनी केली.

बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस (Congress) आणि कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवार उतरवण्यात आले आहेत. पण खरी लढत टीएमसी आणि भाजपमध्ये (BJP) होत आहे. निवडणुकीआधीच ममतांनी राज्यात इंडिया आघाडीसोबत (India Alliance) नसल्याचे स्पषट् केले.

Mamata Banerjee
CJI Chandrachud News : अर्ज बाद केल्याने अपक्ष उमेदवाराची सुप्रीम कोर्टात धाव; चंद्रचूडांनी अक्षरश: पिसं काढली!

प्रचार सभेत ममता म्हणाल्या, बंगालमध्ये इंडिया आघाडी अस्तित्वात नाही. ही आघाडी स्थापन करण्यात माझा महत्त्वाचा वाटा होता. आघाडीला नावही मीच दिले आहे. पण बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपसाठी काम करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला मतदान करू नका, असे आवाहनही ममतांनी केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी तृणमूल आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती. ममतांनी काँग्रेसला केवळ दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता. पण अखेर जानेवारी महिन्यात आपण स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करून इंडिया धक्का दिला होता.

आता प्रचार सभांमध्ये ममतांनी भाजपसह काँग्रेसला टार्गेट केले आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून, काँग्रेसला मत म्हणजे भाजपलाच मत असा प्रचार त्या करत आहेत. देशातील इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असताना बंगालमध्ये मात्र आघाडीतील पक्षांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

R

Mamata Banerjee
Lok Sabha Election 2024 : बहिष्कार...बहिष्कार...बहिष्कार; भाजपशासित राज्यातील 6 जिल्ह्यांत 0 टक्के मतदान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com