YS Sharmila : जगनमोहन यांना मोठा धक्का; बहीण शर्मिला यांची काँग्रेसला साथ

Jagan Mohan Reddy's sister YS Sharmila Joins Congress : जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री...
YS Sharmila Joins Congress
YS Sharmila Joins CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या धाकट्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शर्मिला यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा आधार मिळाला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत शर्मिला यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. मागील काही दिवसांपासून शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तसेच त्या आपला वायएसआर तेलंगणा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची शक्यता आहे.

YS Sharmila Joins Congress
Arvind Kejriwal: केजरीवालांना आज अटक होऊ शकते; 'आप'च्या मंत्र्यांना भीती..

शर्मिला (YS Sharmila) यांनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचवेळी त्या काँग्रेसमध्ये जाण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शर्मिला यांच्या मदतीने काँग्रेसने भारत राष्ट्र समितीची (BRS) सत्ता उलथवून टाकण्यात पक्षाला यश मिळवले.

काँग्रेस हाच देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याची भावना शर्मिला यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. देशाची पायाभरणी आणि खरी संस्कृती पुढे नेण्याचे काम काँग्रेसने केल्याचेही शर्मिला यांनी सांगितले.

त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बुस्टर डोस मिळाला आहे. आंध्र प्रदेशात काँग्रेसचे अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी शर्मिला यांची मोठी मदत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशातील राजकारणापासून शर्मिला यांना सातत्याने दूर ठेवले, असे मानले जाते. त्यामुळेच त्यांना शेजारील तेलंगणाच्या राजकारणात उतरावे लागले. पण तिथेही फारसा जम बसवता न आल्याने आता त्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.

जगनमोहन तुरूंगात असताना त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. सत्ता मिळवण्यासाठी त्याचा फायदाही झाला. आता काँग्रेससाठी त्या मैदानात उतरल्या असून भावाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

YS Sharmila Joins Congress
Mahua Moitra : तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रांना आणखी एक झटका; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com