POCSO FIR Shankaracharya : अल्पवयीन मुलांचे शोषण, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा!

POCSO FIR Avimukteshwaranand : अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणा प्रकरणी कोर्टाच्या निर्देशानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांसह त्यांच्या शिष्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police initiate legal proceedings after a POCSO case was filed against Shankaracharya Avimukteshwaranand over alleged minor exploitation.
Police initiate legal proceedings after a POCSO case was filed against Shankaracharya Avimukteshwaranand over alleged minor exploitation.sarkarnama
Published on
Updated on

POCSO FIR : अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रकरणी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह त्यांच्या एका शिष्यावर पोस्क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील अलहाबाद जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अलाहाबाद जिल्हा न्यायालयात पोस्को कायद्याअंतर्गत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य दंड स्वमी प्रत्यवक्त चैतन्य मुकुंदानंद गिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

आशुतोष ब्रम्हचारी महाराज यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांनी न्यायालयात दोन अल्पवयीन मुलांना देखील हजर केले. मुलांचे जबाब हे कॅमेऱ्यासमोर नोंदवण्यात आले.

न्यायालयाने निर्देश दिले की, या प्रकरणी झूंशी ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात यावी. तसेच कोर्टाने स्पष्ट केले की, या प्रकरणाची निष्पक्ष तपास करण्यात यावा.

न्यायालयाच्या आदेशानंतर आशुतोष यांनी सांगितले की, आमचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये गेलो होतो मात्र आम्हाला कोणी दाद दिली नाही. न्यायालायने आमचे म्हणणे ऐकूण घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्याय अजून जिवंत आहे.

आशुतोष ब्रम्हचारी हे श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आरोप केला की, माघ मेळ्याच्या वेळी अविमुक्तेश्वरानंद यांनी अल्पवयीन मुलांचे शोषण केले. यासाठी मुलांवर अविमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य दबाव टाकत होते.

Police initiate legal proceedings after a POCSO case was filed against Shankaracharya Avimukteshwaranand over alleged minor exploitation.
Pune ZP Panchayat Samiti : पुरंदर, भोर, मुळशीमध्ये 'चिठ्ठ्या' ठरणार किंगमेकर, सभापती होण्यासाठी लागणार नशिबाची साथ?

अविमुक्तेश्वरानंद काय म्हणाले?

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देत नाव न घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आपल्यावर आरोप केले जातील याची कल्पना होती. मात्र, हे इतक्या खालच्या पातळीला जाऊन आरोप करतील याची कल्पना नव्हती. पुढे बोलताना ते म्हणाले, हे दिसत आहे की, धर्माच्या नावाखाली काही लोक नीच पातळीवर जाऊ शकतात,हे दिसत आहे. मात्र, हे धर्मयुद्ध आहे आता आम्ही थांबणार नाही. आपल्याला शेकडो भक्तांचा तसेच वकिलांचा पाठींबा मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Police initiate legal proceedings after a POCSO case was filed against Shankaracharya Avimukteshwaranand over alleged minor exploitation.
Mumbai BMC elections : राज ठाकरेंची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश, मनसेला देणार दोन मोठी पदे; राजकीय घडामोडीना वेग, वादावर पडदा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com