Pune ZP Panchayat Samiti : पुरंदर, भोर, मुळशीमध्ये 'चिठ्ठ्या' ठरणार किंगमेकर, सभापती होण्यासाठी लागणार नशिबाची साथ?

Panchayat Samiti Chairperson : भोर, पुरंदर आणि मुळशी पंचायत समित्यांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती निवड चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय गणितांबरोबर नशिबाचीही साथ महत्त्वाची ठरणार आहे.
Elected members of Pune district Panchayat Samiti as Bhor, Purandar and Mulshi face possible lucky draw for Chairperson selection.
Elected members of Pune district Panchayat Samiti as Bhor, Purandar and Mulshi face possible lucky draw for Chairperson selection.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाचा विचार केलास राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आहे. तसेच बहुतांश पंचायत समितीवर देखील राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता पाहायला मिळत आहे.

मावळ, इंदापूर, दौंड यासारख्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील काही पंचायत समितीमध्ये मात्र कुठल्याही पक्षाला बहुमत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये भोर, मुळशी आणि पुरंदर पंचायत समितीचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी सभापती पदाची निवडची प्रक्रिया ही गुंतागुंतीचे ठरणार आहे.

भोर पंचायत समितीचा विचार केल्यास या ठिकाणी 4 जागा आहेत. त्यामधील 2 जागा या भाजपने जिंकल्या तर दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाला आहे. त्यामुळे स्पष्ट असं बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेले नाही. तसंच या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व एकत्र येण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे समसमान जागा असल्याने या ठिकाणी चिठ्ठीद्वारे सभापती निवडला जाण्याची दाट शक्यता आहे.

पुरंदर पंचायत समितीचा विचार केल्यास त्या ठिकाणी देखील भाजपला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दोन जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे. या ठिकाणी देखील कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने चिठ्ठीवरतीच सभापती ठरण्याची दाट शक्यता आहे.

वेगळ्या राजकीय समीकरणाची शक्यता

मुळशी मध्ये मात्र वेगळाच पेच फसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 6 जागांपैकी सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडे 3 जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात च्या उमेदवारांनी 2 ठिकाणी विजय मिळवला आहे. आणि 1 ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

Elected members of Pune district Panchayat Samiti as Bhor, Purandar and Mulshi face possible lucky draw for Chairperson selection.
Pune ZP Politics : पुण्यात भाजप अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुळशी पॅटर्न ! मांडेकरांना रोखण्यासाठी थोपट्यांची खेळी

एकीकडे या ठिकाणचे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य हे आमचे जुने सहकारी असल्यामुळे ते आमच्या सोबतच राहतील असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे मात्र या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना घेऊन वेगळेच राजकीय गणित साधण्याच्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Elected members of Pune district Panchayat Samiti as Bhor, Purandar and Mulshi face possible lucky draw for Chairperson selection.
Pune district news : पुणे जिल्ह्यात 2 नव्या ग्रामपंचायतींची निर्मिती : ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश, आता निवडणुकीचे वेध

जर थोपटेंना हे गणित साधता आलं तर राष्ट्रवादीच्या तीन आणि भाजप आणि शरद पवारांच्या पक्षाच्या युतीचे तीन असे समसमान सदस्य होतील. अशा वेळी या ठिकाणी देखील चिठ्ठीवर सभापती ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच सभापती निवडीसाठी हा चिठ्ठ्यांचा खेळ खेळला जाणारा असून सभापती होण्यासाठी नशिबाची साथ देखील असणं आता या उमेदवारांना आवश्यक पडणार आहे.त्यामुळे नशीब कोणाला साथ देणार औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com