Ahmednagar Politics : 'फडणवीस म्हणतात वादग्रस्त विधाने करणाऱ्यांची गय नाही, नगरमध्ये मात्र..'; कळमकरांनी घेरले!

Devendra Fadnavis On Controversial Statements: महापुरुषांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
Ahmednagar Politics Devendra Fadnavis
Ahmednagar Politics Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar Political News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केले आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले असून, यातून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. हे थांबण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहरात विशेष लक्ष घालून अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली आहे.

Ahmednagar Politics Devendra Fadnavis
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांना पक्ष अन् चिन्ह देण्यासाठी मोदी-शाहांचा दबाव; शरद पवारांचा गौप्यस्फोट

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने सांगतात की, महापुरुषांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रत्यक्षात अशा बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. नगर शहरात असे प्रसंग वारंवार घडत आहेत. अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला आदेश देणे गरजेचे असल्याचे, कळमकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Ahmednagar Politics Devendra Fadnavis
Ujjwal Nikam News : राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार गटाचाच व्हिप मानावा लागेल, अॅड. उज्वल निकमांनी केले स्पष्ट

अशा घटनांमागचा मास्टरमाईंड शोधून तातडीने कारवाई करावी. अन्यथा पुन्हा असे प्रकार समोर आल्यास रस्त्यावर उतरून चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकवू, असा इशारा कळमकर यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com