Share Market Crash : निवडणूक निकालांनी 43 लाख कोटींचा चुराडा; बाजारात ऐतिहासिक घसरण

Lok Sabha Election 2024 Result Stock Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत गेल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात मोठा भूंकप झाला. मुंबई शेअर बाजार तब्बल 6 हजारांहून अधिक अंकानी कोसळला.
PM Narendra Modi, Share Market
PM Narendra Modi, Share MarketSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Stock Market Latest News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मंगळवारी गुंतवणूकदारांना अक्षरश: रडवले. निकालाचे चित्र स्पष्ट होत गेल्यानंतर बाजारात मोठी उलथापालथ झाली अन् गुंतवणूकदारांचे तब्बल 43 लाख कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. भारतीय शेअर बाजाराने एकाच दिवसांत एवढी मोठी घसरण पहिल्यांदाच पाहिली.

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. त्यामुळे निकालाच्या दिवशीही शेअर बाजारातून चांगली कमाई होईल, अशा आशेने गुंतवणूकदारांनी दिवसाची सुरूवात केली. पण एक्झिट पोल आणि प्रत्येक निकालात तफावत दिसू लागल्यानंतर गुंतवणूकदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् पैसे काढून घेण्यास सुरूवात झाली.

सोमवारी मुंबई शेअर बाजारात जवळपास 2300 अंकांची तेजी होती. मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. निकालाचे कल काही वेगळेच सांगत असल्याचे चित्र निर्माण होताच सुरूवातीलाच बाजार 2000 अंकांनी घसरला.

बीएसईमध्ये मंगळवारी दिवसभरात तब्बल 6 हजारांहून अधिक अंकांची घसरण झाली. बाजार 70 हजार 342 अंकापर्यंत खाली आला होता. निफ्टीमध्येही 8.32 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये 1936 अंकांची घसरण होऊन 21,328 पर्यंत खाली आला. बाजारात 10 टक्क्यांची घसरण झाली असती तर लोअर सर्कीट लागण्याची भीती होती.

PM Narendra Modi, Share Market
Nitish Kumar and Tejashwi Yadav On Same Flight : नितीश कुमार अन् तेजस्वी यादव करणार खेळ? दिल्लीचं राजकारण हादरणार...

बीएसई मार्केट कॅप मंगळवारी 43.2 लाख कोटींनी खाली आले. याचा अर्थ एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे एवढे नुकसान झाले. बाजाराने जानेवारीपासून यामध्ये 45 लाख कोटींची भर घातली होती. घसरणीनंतर मार्केट कॅप 382.68 पर्यंत खाली आले होते.

बुधवारी पुन्हा तेजी

निवडणूक निकालातून पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी मुंबई शेअर बाजार पुन्हा सावरण्यास सुरूवात झाली आहे. बीएसईमध्ये सुरूवातीला 1.95 टक्क्यांची वाढ होत 73.486.14 पर्यंत पोहचला. निफ्टीतही 2,303.40 अंकापर्यंत वाढ पाहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com