शशी थरूर महाबळेश्वरला लग्नाला आले अन् प्रश्न पडला...नक्की नवरदेव कोण?

थरूर यांचा एका लग्नातील फोटो व्हायरल झाला आहे.
Shashi Tharoor posed with the newlywed couple.
Shashi Tharoor posed with the newlywed couple.Sarkarnama

मुंबई : विविध कारणांनी सतत चर्चेत असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणखी एका फोटोमुळे ट्रोल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महिला खासदारांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर त्यांना खुलासाही करावा लागला होता. आता लग्नातील एका फोटोवरून अऩेक नेटकऱ्यांनी थरूर यांना ट्रोल केले आहे.

महाबळेश्वरमध्ये (Mahableshwar) झालेल्या एका विवाहाला शरूर यांनीही हजेरी लावली होती. या लग्नातील जोडप्यासोबतचा थरूर यांचा फोटो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. नवरदेवाने थरूर यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. थरूर एवढ्या लांबून दोन दिवसांसाठी महाबळेश्वरमध्ये आले आणि आमच्या लग्नाचा आनंद घेतला, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थरूर हे या फोटोमध्ये पारंपरिक वेषभूषेत दिसत आहे. डोक्यावर फेटा अन् गळ्यात हारही आहे. त्यावरून अनेक नेटकऱ्यांनी शरूर यांनाच ट्रोल केले आहे. नेमके नवरदेव कोण आहेत, असा सवाल अनेकांनी केला आहे. नवरदेवाला उद्देशूनही काहींनी कमेंट केल्या आहेत. या प्रतिक्रियांनंतर शशी थरूर यांनी ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.

राजकारणाशी संबंध नसलेल्या लोकांना ट्रोलर्सनी आपली शिकार बनवू नये. हे खूपच निंदनीय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भक्तांच्या एका ब्रिगेडच्या अशा प्रकारच्या ट्रोलिंगची मला सवय आहे. मला माहित आहे, हे कुठून येते. पण यामध्ये राजकारणाशी संबंध नसलेल्या लोकांना जोडू नये. एका जोडप्याला लग्नाच्या प्रसंगी अशा प्रकारे अपमानित करणे निंदनीय आहे, अशी टीका शरूर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com