भाजपचा दे धक्का! पंजाबमध्ये अकाली दलाचा बडा नेता गळाला

पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात फोडाफोडी सुरू झाली आहे.
Amit Shah, Manjinder Singh and J.P.Nadda
Amit Shah, Manjinder Singh and J.P.NaddaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) सोडून नवी चूल मांडली आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेऊन आघाडीसाठी हात पुढे केला आहे. पंजाबसाठी भाजपची (BJP) जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसनंतर आता भाजपने शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का दिला आहे.

भाजपने एकेकाळी सहकारी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाला आज धक्का दिला आहे. अकाली दलाचे नेते मंजिंदरसिंग सिरसा (Manjinder Singh Sirsa) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ते दिल्ली शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्या रुपाने भाजपच्या गळाला अकाली दलाचा बडा नेता लागला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत सिरसा यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. सिरसा हे अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांचे निकटवर्ती होते. शीख धर्माशी निगडित मुद्द्यांवर ते त्यांचे मत महत्वाचे मानले जाते.

पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदरसिंगांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपसमोर आघाडीसाठी हात पुढे केला आहे. कॅप्टन यांची साथ भाजपने पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. राज्यातील इतर पक्षांतील नेत्यांना फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.

Amit Shah, Manjinder Singh and J.P.Nadda
मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला! माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू होता. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Amit Shah, Manjinder Singh and J.P.Nadda
कंगनाचा पाय खोलात; थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं प्रकरण!

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com