मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला! माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदरसिंगांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
Congress
Congress Sarkaranama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांची काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे विकेट पडली होती. आता अमरिंदरसिंग यांनी चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदरसिंगांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपसमोर आघाडीसाठी हात पुढे केला आहे. त्यांनी आता एकेकाळचे सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमरिंदरसिंग म्हणाले की, मुख्यमंत्री चन्नी काहीही म्हणत असले तरी ते मला घाबरतात. त्यामुळेच त्यांना माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मुख्यमंत्री त्यांचे काम करताना दिसत नाहीत. ते केवळ राज्याचा दौरा करण्यात गुंतले आङेत. मी आतापर्यंत काँग्रेसचा 14 सरचिटणीसांना सांभाळले आहे. सध्याचे सरचिचणीस हरीश चौधरी हे प्रत्येक सरकारी बैठकीला उपस्थित राहात आहेत. त्यांना असा कोणताही अधिकार नाही. पंजाब सरकार चन्नी नव्हे तर चौधरी चालवत आहेत.

दलित मुख्यमंत्री या शब्दाला माझा विरोध आहे. चन्नी हे चांगले आहेत परंतु, ते चांगले प्रशासक ठरतात की नाही हे येणारा काळ ठरवेल. मला तर असे वाटते की, भारताने आता एखादा व्यक्ती दलित अथवा जाट आहे, या मानसिकतेतून बाहेर पडावे, असेही अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले.

Congress
कंगनाचा पाय खोलात; थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं प्रकरण!

चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा यांच्यासोबत काँग्रेस हाय कमांडने सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी हे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Congress
भाजपचा मित्रपक्ष काँग्रसेच्या वळचणीला गेला अन् महुआ मोईत्रा भडकल्या

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com