Shrikant Shinde : मॅच्युअर व्हा, महापालिकेत नाय आता..! लोकसभेतच '50 खोके एकदम ओके' म्हणणाऱ्या महिला खासदारावर श्रीकांत शिंदे भडकले...

Background of the '50 Khoke' Slogan in Maharashtra Politics : विरोधातील सर्व लोक इंटिलिजन्स फेल्युवरवर बोलत आहेत. दहशतवादी कसे आले, कुठून आले, हे विचारत होते, असे श्रीकांत शिंदे बोलल्यानंतर विरोधी बाकांवरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला.
Srikant Shinde reacts strongly to '50 Khoke Ekdam OK' slogan shouted in Lok Sabha, stirring political controversy.
Srikant Shinde reacts strongly to '50 Khoke Ekdam OK' slogan shouted in Lok Sabha, stirring political controversy. Sarkarnama
Published on
Updated on

Srikant Shinde's Sharp Reaction and Political Implications : ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काही विधानांचाही त्यांनी समाचार घेतला. विरोधकांचे आरोप, दावे त्यांनी खोडून काढले.

श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाआधीच प्रियांका गांधींचे भाषण झाले होते. त्यानंतर शिंदे भाषणासाठी उठले. भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विरोधी बाकावरून एका महिला खासदारांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिंदेंनीही लगेच पलटवार करत मराठीतूनच जोरदार प्रत्त्युत्तर दिले.

विरोधातील सर्व लोक इंटिलिजन्स फेल्युवरवर बोलत आहेत. दहशतवादी कसे आले, कुठून आले, हे विचारत होते, असे श्रीकांत शिंदे बोलल्यानंतर विरोधी बाकांवरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. अरे प्रियांका से आगे बढो, आगे बढो, 50 खोके-एकदम ओके, असे बोलण्यात आले. त्यावर संतापलेल्या शिंदेंनी भाषण थांबवत ‘अरे आता मॅच्यूअर व्हा, वरती या, पार्लमेंटमध्ये आले, महापालिकेत नाय आता’, असा पलटवार शिंदे यांनी केला.

Srikant Shinde reacts strongly to '50 Khoke Ekdam OK' slogan shouted in Lok Sabha, stirring political controversy.
Amit Shah vs Rahul Gandhi : अमित शहांकडून संसदेतच राहुल गांधींना चॅलेंज; लोकसभेत जोरदार घमासान...

शिंदे मराठीतून बोलल्याने संबंधित महिला खासदार महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले. शिंदेंनी त्यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे आता या महिला खासदार नेमक्या कोण होत्या, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. अनेकदा काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या संसदेत आक्रमक झालेल्या दिसल्या आहेत. आमदार असतानाही त्या विधानसभेत आक्रमकपणे भूमिका मांडायच्या. त्यामुळे त्यांनीच शिंदेंना डिवचले का, अशाही चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना तमाशा असा शब्द वापरला होता. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. तीन-तीन वेळा कपडे बदलणारे गृहमंत्री, असा उल्लेख त्यांनी केला.

Srikant Shinde reacts strongly to '50 Khoke Ekdam OK' slogan shouted in Lok Sabha, stirring political controversy.
Operation Sindoor Debate : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा कसा झाला? शहांनी संसदेत पूर्ण प्लॅन सांगितला...

श्रीकांत शिंदे यांनी 2006 चा उल्लेख करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांना प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यातील आरोपींची सुटका पुराव्यांअभावी नुकतीच कोर्टाने केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावरून त्यांनी तत्कालीन सरकारवर निशाणा साधला. सावंत यांनी आपल्या भाषणादरम्यान सरकारची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com