Operation Sindoor Debate : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा कसा झाला? शहांनी संसदेत पूर्ण प्लॅन सांगितला...

Pahalgam Terror Attack: What Happened? : ऑपरेशन महादेवची सुरूवात 22 एप्रिलला झाली होती. ज्यादिवशी हल्ला झाला त्याचदिवशी रात्री एक मीटिंग घेतली होती. हल्ला एक वाजता झाला होता, मी सायंकाळी 5.30 वाजता श्रीनगरमध्ये होतो, असे अमित शहांनी सांगितले.
Amit Shah on Operation Sindoor
Amit Shah on Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah’s Detailed Statement in Parliament : संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन महादेव'चे प्लॅनिंग, दहशतवाद्यांची ओळख कशी पटली, याबाबतची संपूर्ण माहितीही शहांनी दिली.

अमित शहांनी सांगितले की, सोमवारी ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. हे तिघेही ए ग्रेडचे दहशतवादी होते. ज्यांना पहलगामध्ये पर्यटकांना मारले होते, त्यात या तिघांचा सहभाग होता. त्या तिघांचाही आता खात्मा झाला आहे. हल्ल्यासाठी 2 एके 47 आणि एका एम 9 कार्बाईनचा वापर करण्यात आला होता.

ऑपरेशन महादेवची सुरूवात 22 एप्रिलला झाली होती. ज्यादिवशी हल्ला झाला त्याचदिवशी रात्री एक मीटिंग घेतली होती. हल्ला एक वाजता झाला होता, मी सायंकाळी 5.30 वाजता श्रीनगरमध्ये होतो. बैठकीत सर्व सुरक्षा दल होते. त्यामध्ये पहिला निर्णय झाला की, हे दहशतवादी भारत सोडून पाकिस्तानात पळून जाता कामा नयेत.

Amit Shah on Operation Sindoor
Hasan Mushrif : मुश्रीफांचा राजीनामा तयार, पण नेत्यांच्या आग्रहाखातर निर्णय बदलला!

आयबीकडे 22 एप्रिलला एक माहिती मिळाली की दाचीगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काही उपकरणांच्या आधारे दहशतवाद्यांचे सिग्नल मिळविण्यासाठी 22 मे ते 22 जुलैपर्यंत सातत्याने प्रयत्न केले गेले. दोन महिन्यांनी सेन्सर्सच्या माध्यमातून दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. लष्कराच पॅरा फोरचे जवान, सीआरपीएफ आणि लष्कराच्य जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले. काल झालेल्या ऑपरेशनमध्ये तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

याच तिन्ही दहशतवाद्यांनीच पहलगाम हल्ला केला, याची पुष्टीही करण्यात आली आहे. ‘एनआयए’ने आधीच त्यांना आसरा देणारे, खायला देणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरमध्ये आणण्यात आल्यानंतर यापैकी चौघांनी हेच तिघे असल्याचे सांगितले. पण त्यानंतरही आम्ही घाई केली आहे.

Amit Shah on Operation Sindoor
Congress Politics : थरूर यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याचं बंड? अधिवेशन सुरू असतानाच दिले मोठे संकेत...

पहलगाम येथील घटनास्थळावरून बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या होत्या, त्याचा एफएसएल रिपोर्ट आधीच केला होता. चंदीगडमधील सेंटरमध्ये तो रिपोर्ट तयार होता. काल मारण्यात आलेल्या तिघांच्या रायफल्स आणि त्यातील गोळ्यांची खातरजमा करण्यात आली. त्यानंतरही आम्ही या रायफल्स विशेष विमानाने चंदीगढला पाठविल्या. रात्रभर फायरिंग करून त्याच्यातून निघालेल्या गोळ्या, त्याचे अवशेष अशा सगळ्यांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा हे निश्चित झाले की याच तिन्ही रायफल्सने आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

जवळपास 1 हजार 55 लोकांची 3 हजारांहून अधिक तासांची चौकशी एनआयएने केल्याचेही शहांनी सांगितले. त्याआधारे स्केच तयार करण्यात आले. त्यानंतर हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांना आश्रय दिलेल्या दोघांची ओळख पटली. त्यांना अटक करण्यात आली. दोघांनी सांगितले की, 21 एप्रिलला दहशतवादी आले होते, त्यांच्याकडे रायफल्स होत्या. जेवण केले आणि चहा पिले आणि निघून गेले, अशी माहितीही यावेळी अमित शहांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com