Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला : नव्या मंत्र्यांच्या यादीला मंजुरी नाहीच; दिल्लीवरून मुख्यमंत्र्यांसह नेते परतले

Karnataka Cabinet Expansion : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला असून दिल्लीला गेलेले सर्व नेते कर्नाटकात परतले आहेत.
DK Shivakumar
DK Shivakumar Sarkarnama
Published on
Updated on

Shivakumar Cabinet Expansion News : बहुप्रतिक्षित शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बुधवारी (ता. २२) मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते; मात्र काँग्रेस हायकमांडने नव्या मंत्र्यांच्या अंतिम यादीला अद्याप मंजुरी न दिल्याने शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे दिल्लीत दाखल झाले होते; मात्र मंगळवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते ‘नीट’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याने प्रस्तावित बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे मंत्रिपदाच्या उमेदवारांवर अंतिम चर्चा पुढे ढकलावी लागल्याची माहिती मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षात हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. राज्य नेतृत्वाचे मत जाणून घेतल्यानंतरच पक्षश्रेष्ठी नव्या मंत्र्यांची निवड करतात. नव्या चेहऱ्यांना संधी, जिल्हानिहाय आणि प्रादेशिक समतोल यांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

DK Shivakumar
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराआधीच राजकारण तापले; धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला जरांगेंचा विरोध; ओबीसी नेताही मैदानात, म्हणाले...

मंत्रिपदासाठी नवे निकष?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही नवे निकष ठरविल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, शिवकुमार यांनी थेट उत्तर देणे टाळले. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माध्यमांसमोर चर्चा केली जात नाही. यापूर्वीही आमदार नसतानाही काहींना मंत्री बनविले आहे. विविध सरकारांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले.

सर्व रिक्त जागा भराव्यात, अशी इच्छा

मंत्रिमंडळातील उर्वरित सर्व २० रिक्त जागा भरल्या जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘सर्व जागा भराव्यात असे वाटते. पदे रिक्त ठेवण्यात काहीच अर्थ नाही. मुख्य प्रतोद, विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष ही पदेही लवकर भरली जावीत.’

DK Shivakumar
Cabinet Expansion : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; भाजपच्या 2, राष्ट्रवादीच्या 1 अन् शिवसेनेच्या 2 मंत्र्यांना नारळ? 6 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होणार?

राज्यपालांची परवानगी घेतली; पण...

मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, बुधवारी होणाऱ्या शपथविधीसाठी राज्यपालांची परवानगीही घेतली होती; मात्र मंगळवारी नियोजित बैठक रद्द झाल्याने कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com