पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून (BJP) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील महिन्यात फडणवीस गोव्यात दाखल झाले त्याच रात्री काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष व आमदाराने त्यांची भेट घेतल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. अखेर या आमदाराने काँग्रेस आणि भाजपला ठेंगा दाखवत दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे.
गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मागील निवडणुकीनंतर काँग्रेसचे संख्याबळ अधिक असूनही सत्ता स्थापन करता आली नव्हती. भाजपने मगोपला सोबत घेत सत्ता खेचून आणली. त्यानंतर मागील पाच वर्षांत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यातच अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांच्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी काँग्रेससोबत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.
भाजपने फडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी बनवले आहे. त्यामुळे फडणवीस 23 नोव्हेंबरला गोव्यात दाखल झाले होते. ते मुक्कामी असलेल्या हॉटेलात मध्यरात्री लॉरेन्स यांनी अचानक एन्ट्री केली होती. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होती. त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले होते. लॉरेन्स लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
हॉटेलातून बाहेर पडताना लॉरेन्स यांना माध्यमांनी फडणवीसांची भेट घेतल्याबाबत विचारले होते. पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. 'आप'ने लॉरेन्स यांचा याबाबतचा व्हि़डीओ ट्विट केला होता. काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही आपने केला होता. काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने गोव्याला फसवलं. लॉरेन्स हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत, असे आपने म्हटले होते. त्यामुळे लॉरेन्स यांच्या भाजप प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर ते तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर गेल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.