'ईडी'च्या रडारवरील खासदार भावना गवळींनी बांधली थेट PM नरेंद्र मोदींना राखी...

ED | Bhawana Gawali | PM Narendra Modi | गवळींच्या मागे लागलेले ईडीचं सावट दूर होणार?
Bhawana Gawali | PM Narendra Modi
Bhawana Gawali | PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना (शिंदे गट) खासदार आणि मुख्य प्रतोद भावना गवळी यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून आपले रक्षाबंधन साजरे केले. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन याबाबतची माहिती दिली.

अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना छोटी बहिण या नात्याने मी राखी बांधत आलेली आहे. आज दिनांक 11/08/2022 रोजी मा पंतप्रधान महोदयांना राखी बांधण्याचे भाग्य प्राप्त झाले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाली, असे भावना गवळी यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (PM Narendra Modi celebrating raksha bandhan)

सोशल मिडीयावर मात्र या फोटोवरुन भावना गवळी टीकेच्या देखील धनी ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्या शिवसेनेच्या इतर १२ आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होवून भाजप सोबत गेल्या. त्यावेळी त्यांच्यावर ईडी कारवाई सुरु असल्यानेच भाजपसोबत गेल्याची टीका करण्यात आली होती.

Bhawana Gawali | PM Narendra Modi
केसरकर म्हणतात...मी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही, करणार नाही

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळी या 'ईडी'च्या रडारवर आल्या आहेत. यात त्यांच्या स्वीय सहायकाला अटकही करण्यात आली होती. यावरुन भाजपनेही गवळी यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. पुढे राज्यातील राजकीय घडामोडी होऊन सत्तांतर झाले. गवळींसह १२ खासदारांनीही बंडखोरांना साथ दिली.

Bhawana Gawali | PM Narendra Modi
Eknath Shinde इतक्या वेळा दिल्लीला गेले पण राज्यासाठी निधी नाही मागितला....

योगायोगाने त्याचवेळी जवळपास सहा महिन्यांनंतर गवळींच्या स्वीय सहायकाची कोठडीतून सुटका झाली. अशात आता खासदार भावना गवळी-भाजपची जवळीक वाढली असून त्यांनी रक्षाबंधननिमित्त पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधली. त्यामुळे आता गवळी यांच्याही मागे लागलेले ईडीचं सावट दूर होणार का, असा सवाल त्यांच्या फेसबूकच्या कमेंट बॉक्समध्ये विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com