
बातमीत थोडक्यात काय?
मोहन भागवत यांच्या निवृत्तीबाबतच्या विधानामुळे नरेंद्र मोदींच्या राजकीय भविष्यावर चर्चा सुरू झाली असून, पंतप्रधानपदासाठी योगी, शाह, गडकरी आदींच्या नावांसह नवीन नावांचा विचार होतो आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला दलित नेत्याला पंतप्रधान करण्याचे आव्हान देत गोविंद करजोल आणि चलवादी नारायणस्वामी यांची नावे पुढे केली आहेत.
या आव्हानाला उत्तर देताना भाजपचे विजयेंद्र यांनी काँग्रेसला खर्गेंचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करण्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
Impact on Karnataka's Political Landscape : सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडणाऱ्यांच्या निवृत्तीबाबत काही दिवसांपूर्वीच विधान केले होते. हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच होते, या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे मोदींनंतर पंतप्रधानपदी कोण, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध नावे पुढे येत आहेत.
काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यात आणखी दोन नावांची भर घातली आहे. त्यांनी भाजपमधील दोन नेत्यांची नावे पंतप्रधानपदासाठी सुचविली आहे. तसेच त्यांनी भाजपला पंतप्रधानपदासाठी दलित नेत्याची निवड करण्याचे आव्हानही त्यांनी भाजपला दिले आहे.
सिध्दरामय्या यांनी कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधीच नरेंद्र मोदींच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पंतप्रधानपदी दलित व्यक्तीला बसविण्याची भाजपसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याची सुरूवात तुम्ही करा, असे आव्हान सिध्दरामय्या यांनी विजयेंद्र यांना दिले आहे.
दुसऱ्यांना लेक्चर देण्यापेक्षा तुम्हीच पंतप्रधान पदासाठी दलित नेत्यांची नावे का सुचवत नाही, असा सवाल करत सिध्दरामय्या यांनी गोविंद करजोल आणि चलवादी नारायणस्वामी यांची नावे सुचविली आहेत. त्यांचे नावे तुम्ही या पदासाठी सुचविली तर तुमचे अभिनंदन करणारा मी पहिला असेन, असेही सिध्दरामय्या म्हणाले आहेत.
गोविंद करजोल हे भाजपचे कर्नाटकातील खासदार आहेत. चलवादी नारायणस्वामी हे कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असून त्यांनी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. दरम्यान, सिध्दरामय्या यांच्या या आव्हानानंतर विजयेंद्र यांनीही पलटवार केला आहे. काँग्रेस दलितांसोबत असेल तर मग पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खर्गेंचे नाव जाहीर करावे, असे आव्हान विजयेंद्र यांनी दिले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: मोहन भागवत यांच्या विधानामुळे कोणती चर्चा रंगली आहे?
उत्तर: नरेंद्र मोदींच्या राजकीय निवृत्तीची आणि त्यानंतरच्या पंतप्रधानपदासाठी संभाव्य नावांची.
प्रश्न: सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानपदासाठी कोणती नावे सुचवली?
उत्तर: गोविंद करजोल आणि चलवादी नारायणस्वामी ही दलित नेत्यांची नावे.
प्रश्न: विजयेंद्र यांनी काँग्रेसला काय आव्हान दिले?
उत्तर: त्यांनी काँग्रेसला मल्लिकार्जून खर्गेंचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याचे आव्हान दिले.
प्रश्न: चलवादी नारायणस्वामी कोण आहेत?
उत्तर: कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.