
April May June murder rates : मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत. त्यातच राज्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने संतापजनक विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
बिहारचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कुंदन कृष्णन यांनी हे विधान केले आहे. राज्यातील वाढत्या हत्येच्या घटनांबाबत मीडियाशी बोलताना त्यांनी थेट शेतकऱ्यांमुळे या काळात गुन्हेगारी वाढत असल्याचे सूचक विधान केले आहे. या विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
कुंदन कृष्णन म्हणाले, काही दिवसांपासून संपूर्ण बिहारमध्ये हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. सर्वाधिक हत्या एप्रिल, मे आणि जूनमध्ये झाल्या. पावसाळा सुरू होईपर्यंत हे प्रकार सुरू असताना कारण या काळात शेतकऱ्यांना काही काम नसते. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी शेतकामांत व्यस्त होतात आणि गुन्हे कमी होतात.
संपूर्ण बिहारमध्ये हत्या होत आहेत. अशा घटना घडत असतात. पण माध्यमे एकामागोमाग एका हत्येच्या घटनांवर फोकस करत आहे. निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय पक्षांकडूनही त्याकडे अधिक लक्ष वेधले जात आहे. या घटनांची चिंता आम्हाला आहे. पैशांसाठी असे गुन्हे करण्याचे प्रमाण तरूणांमध्ये वाढत आहे, असेही अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणाले आहेत.
दरम्यान, बिहारमध्ये मागील काही दिवसांत काही प्रसिध्द व्यक्तींच्याही हत्या झाल्या आहेत. उद्योजक गोपाळ खेमका यांच्या हत्येने संपूर्ण बिहार हादरले होते. पटनातील राहत्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने खेमका यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. भाजप नेते सुरेंद्र केवट यांचीही मागील आठवड्यातच हत्या झाली आहे. या घटनांमुळे सध्या बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए सरकार बॅकफूटवर गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.