Karnataka CM Oth Ceremony : सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; डी. के.शिवकुमार नवे उपमुख्यमंत्री

काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Karnataka CM Oth Ceremony :
Karnataka CM Oth Ceremony : Sarkarnama

Karnataka CM Swearing In Ceremony:  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज (20 मे) सरकार स्थापन करणार आहे. काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. (Siddaramaiah will take oath as Chief Minister and DK Shivakumar as Deputy CM today)

Karnataka CM Oth Ceremony :
Jayant Patil On RBI : "दोन हजाराच्या नोटा किती छापल्या? बँकेत किती अन् व्यवहारात किती? सरकारने हिशेब द्यावा.."

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12:30 वाजता कांतेराव स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 2013 मध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे, 61 वर्षीय शिवकुमार (D.K. Shivkumar) जे यापूर्वी सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.

या शिवाय मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरामय्या आणि शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणार्‍या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले. (Karnataka Politics)

Karnataka CM Oth Ceremony :
Maharashtra Politics : 'पोपट मेला' वरुन अजितदादांनी विरोधकांची पिसं काढली..; फडणवीसांची उडवली..

काँग्रेसने गुरुवारी (18 मे) कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा केली. तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शिवकुमार यांना एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यानंतर गुरुवारीच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड करण्यात आली. सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला.

सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्नाटकचे नवे सरकार आपल्या पाच घोषणा पूर्ण करणार का, याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या घोषणांमध्ये 200 युनिट मोफत वीज (गृह ज्योती), घरातील प्रत्येक महिला प्रमुखाला (गृहलक्ष्मी) 2,000 रुपये मासिक मदत, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो मोफत तांदूळ (अण्णा भाग्य), बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रुपये 3,000 आणि बेरोजगार पदविकाधारकांना (18-25 वयोगटातील) दोन वर्षांसाठी रुपये 1,500 (युवा) निधी) आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास (शक्ती). या घोषणा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केल्या होत्या. या घोषणा सरकार पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com