RJD Bihar Politics : नितीशकुमार, उपेंद्र यादव अन् चिराग पासवान यांच्याबाबत 'RJD'चा मोठा दावा!

NitishKumar, Chirag Paswan, Upendra Yadav : '1 जून रोजी मतदान संपताच...' असं भाकीतही राजद प्रवक्ते चित्तरंगन गगन यांनी केलं आहे.
Nitish Kumar, Chirag Paswan, Upendra Yadav
Nitish Kumar, Chirag Paswan, Upendra YadavSarkarnama

RJD On NDA : राष्ट्रीय जनता दलाने दावा केला आहे की, 'सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर NDA आघाडीत कलह सुरू झाला आहे. परिस्थिती अशी आहे की भाजप आणि जदयू यांच्यातही तणाव वाढू लागला आहे. एनडीए मधील हा कलह चार जून रोजी निकाल लागल्यानंतर लोकांना दिसणार आहे.

राजद प्रवक्ते चित्तरंगन गगन यांनी गरुवारी म्हटले की, 'पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हाती कमळाचे चिन्ह दिलं जाताच, बॅनरवरून नीतिश कुमारांचा(NitishKumar) फोटोही गायब झाला. ज्यामुळे जदयू मध्ये असंतोष मोठ्याप्रमाणावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, त्यांनी हेही म्हटले की रोड शो नंतर नितीश कुमार भाजपसोबत नंतर कोणत्याही मंचावर दिसले नाहीत. दुसरीकडे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे की जदयू समर्थकांनी भाजप उमेदवारांचा विश्वासघात केला आहे. हीच परिस्थिती लोजपा(रामविलास) यांची सुद्धा आहे.'

याशिवाय गगन यांनी असेही म्हटले की, लोजपा समर्थक तर आता उघडपणे म्हणत आहेत की, जदयूची लोकं उघडपणे चिराग पासवान(Chirag Paswan) आणि पक्षाच्या दुसऱ्या उमेदवारांच्या विरोधात सक्रीय होते, परंतु भाजप नेतृत्व मूकदर्शकाच्या भूमिकेत राहिले.

याचबरोबर उपेंद्र कुशवाह यांची परिस्थिती तर अजूनही खराब आहे. भाजप आणि जदयू दोघेही कुशवाह यांचे राजकीय भविष्यास संपवण्याच्या मागे आहेत. हे त्यांनाही समजत आहे, परंतु ते मजबुरीने गप्प आहे. शक्यता आहे 1 जून रोजी मतदान संपताच ते तोंड उघडतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com