BJP Ex MLA Case : मतचोरीच्या गोंधळात भाजप नेत्यावर गुन्हा दाखल, एसआयटीनेच नाव घेतल्याने खळबळ

BJP Ex MLA Subhash Guttedar named in SIT charge sheet Over Aland Vote Chori Case : देशात मतचोरी प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात देखील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.
Vote Chori Case
Vote Chori Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणात SITने सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

  2. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा आणि वैयक्तिक सचिव यांचा समावेश आहे.

  3. हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी मतचोरीवर हल्लाबोल करत असतानाच ही कारवाई झाल्याने राजकीय वाद वाढला आहे.

Karnataka Vote Chori Case : सध्या देशाच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून मतचोरीचे गंभीर आरोप केलेच जात आहेत. त्यांच्याकडून भाजपवर हल्लाबोल होत असतानाच कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतचोरीचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांनी याबाबत दिल्लीतील पत्रकार परिषदेत पुरावे दाखवले होते. ज्यानंतर आता कर्नाटकात राजकीय भूकंप आला आहे. यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून शुक्रवारी (ता.१३) एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या रोपपत्रात भाजपच्या माजी आमदारासह सात जणांची नावे असल्याने मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्या होत्या. यावेळी आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून तब्बल ५,९९४ मतदारांची नावे हटविण्यात आली होती. तर ही नावे बेकायदेशिरपणे हटविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच त्यांनी याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली होती. यावेळी मतदारांची नावे वगळण्यासाठी ६,०१८ अर्ज आल्याचे समोर आले होते. तर याकामी मारे ४.८ लाख रुपये इतका खर्च केल्याचे तपासात उघड झाले होते.

या तपासात डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदल्याचेही उघड झाले होते. ज्यानंतर एसआयटीने भाजपचे नेते सुबोध गुट्टेदार यांच्या संबंधित मालमत्तांवर छापे टाकत कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधूनच हे सर्व अर्ज पाठवविले तपासात निष्पन्न झाले. यानंतरच एसआयटीने आलंदचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, त्यांचे वैयक्तिक सचिव टिप्परुद्र यांच्यासह सात जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

Vote Chori Case
Pune Vote Chori: पुण्यातही वोट चोरी? ठाकरेंच्या वकिलांनी समोर आणलं सीसीटीव्ही फुटेज: सरकारी कार्यालयाला आतून कडी...

एसआयटी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात २२ हजार पानांचे पुरावे देण्यात आले असून ज्यात फसवणूक, तोतयागिरी, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तर एसआयटीने दिलेल्या २२ हजार पानांच्या पुराव्यांमध्ये जवळपास १५ हजार पाने निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या डेटाची आहेत. तसेच या तपासात बापी आद्या नामक आरोपीकडून केलेल्या चौकशीत ‘OTPbazaar’ नावाची वेबसाइट अमेरिकेतील ‘SMSAlert’ नावाच्या साइटशी जोडली गेल्याचे उघड झाले आहे. त्याद्वारेच कलबुर्गी डेटा सेंटरला OTP बायपास सेवा पुरवल्याचा पोलिसांचा संशय आहे.

प्रकरण कसे उघडकीस आले होते? फेब्रुवारी २०२३ मध्ये आलंदमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदारांची नावे हटविण्यासाठी बेकायदा अर्ज केले जात असल्याची कुणकूण लागली होती. त्याप्रमाणे चौकशी मागणी करण्यात आली होती. तर निवडणुकांच्या काही कलबुर्गीचे सहायक आयुक्त यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. यानंतरच राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा आरोप केला होता. ज्यानंतर या प्रकरणाला गती देण्यात आली.

या तपासात अर्ज करण्यासाठी ७५ वेगवेगळे भ्रमणध्वनी क्रमांक वापरल्याचे समोर आले. तर हे सर्व नंबर पोल्ट्री फार्म कामगारांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचे असल्याचेही उघड झाले. तर मतदारांचे नाव व पत्तेही चुकीचे होते. तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या पडताळणीत फक्त २४ मतदारच मतदार यादीतून हटवण्यायोग्य असल्याचे आढळले होते. मात्र त्यावेळी तब्बल ५,९९४ मतदारांची नावे हटविण्यात आली होती.

दरम्यान आता सुभाष गुट्टेदार यांनी बेकायदा मतदार वगळण्याच्या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले असून आपण फक्त भाजपाच्या तिकिटावरून आलंदमधून निवडणूक लढवली होती. आणि यादरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र या प्रकरणात आता विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केल्याने गुट्टेदार यांचे पाय खोलात गेले आहेत. सोबतच भाजपाची राजकीय कोंडी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

Vote Chori Case
Vote Chori : नवऱ्याचे इंदापुरात अन् बायकोचे बारामतीत मतदान; शरद पवारांच्या शिलेदाराच्या आई-वडिलांचं नाव पिंपरी-चिंचवडमधून गायब

FAQs :

1. मतचोरी प्रकरण कुठे उघडकीस आले आहे?
कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघात.

2. आरोपपत्रात कोणाकोणाची नावे आहेत?
सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, वैयक्तिक सचिव टिप्परुद्र यांच्यासह सात जणांची नावे आहेत.

3. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

4. राहुल गांधी या मुद्द्यावर काय भूमिका घेत आहेत?
मतचोरी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

5. या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
निवडणूक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होऊन राष्ट्रीय राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com