Parliament Winter Session : मोठी बातमी! संसद आवारात खासदारांमधील धक्काबुक्की प्रकरणी आता 'SIT' गठीत

Parliament Protests on Ambedkar Issue : एसआयटी पथकात दोन पोलीस अधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक असणार.
Rahul Gandhi, Pratap Sarangi
Rahul Gandhi, Pratap SarangiSarkarnama
Published on
Updated on

SIT Formed in Parliament scuffle : संसंद आवारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेच्या चौकशीने आता वेग घेतला आहे. हे प्रकरण आता संसद मार्ग पोलीस ठाण्याकडून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेडकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखेचे चाणक्यपुरीमधील ISC यूनिट करेल.

हे प्रकरण संसदेच्या आवारात खासदारांमधील धक्काबुक्कीचे आहे. ज्यामध्ये भाजपचे(BJP) दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत गंभीर जखमी झाले होते. दोघांचाही उपचार आरएमएल रुग्णालयात सुरू आहे. अशावेळी घटनेचे गांभीर्य बघता याच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेची एक एसआयटी स्थापन करण्यात आलीआहे.

गुन्हे शाखेच्या एसआयटी पथकात दोन पोलीस(Police) अधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक असतील, जे थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील. या प्रकरणाच्या तपासात दोन एसपींना समाविष्ट करण्यात आले आहे, कारण हे प्रकरण पॉलिटिकली हायप्रोफाईल आहे.

Rahul Gandhi, Pratap Sarangi
Arvind Kejriwal Video : आंबेडकरांच्या अवमानावरून राजकारण तापले; केजरीवालांनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'दलित विद्यार्थ्यांना...'

सर्वधारणपणे पाहण्यात आले आहे की, पॉलिटिकली हायप्रोफाईल प्रकरणं नेहमीच दिल्ली पोलिसांची आयएससीचे गुन्हे शाखेचे पथककडेच तपास सोपवला जातो. प्राप्त माहितीनुसार संसदीय व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही फुटेजसाठी पत्र पाठवले जाईल. ज्यामध्ये घटनेशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Rahul Gandhi, Pratap Sarangi
Devendra Fadnavis : वाल्मिक कराडला अटक होणार का ? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांतर्गत प्रकरण दाखल करून घेतलं आहे. राहुल गांधींना(Rahul Gandhi) या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं जावू शकतं. या प्रकरणात काँग्रेसनेही भाजप खासदारांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.तर काँग्रेसनेही भाजप खासदारांनी जाणूनबुजून आमचा मार्ग रोखून आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप केलेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com