Devendra Fadnavis : वाल्मिक कराडला अटक होणार का ? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Beed Politcal News : नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. या अधिवेशनकाळात झालेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.
Devendra Fadnavis, walmik karad
Devendra Fadnavis, walmik karad Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार कुठे गेले आहेत? ते आधीच बातमी होऊ नये म्हणून सांगत असल्याचे म्हटले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना यावेळी वाल्मिक कराडला अटक होणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टच सांगितले. (Devendra Fadnavis News)

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांची पत्रकार परिषद पार पडली. राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय या अधिवेशनात घेतले आहेत. सहा दिवसात सरकारने भरगच्च काम केले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय या अधिवेशनकाळात झालेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.

Devendra Fadnavis, walmik karad
Santosh Deshmukh Murder Case : CM फडणवीसांनी आरोपींना शिक्षा करण्याची घोषणा करताच, संतोष देशमुखांच्या मुलीने केली 'ही' मोठी मागणी

या पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराने वाल्मिक कराडला अटक होणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'मी कालही सांगितले की, कोणालाही सोडले जाणार नाही. पोलीस सगळ्यांचा मागोवा घेत आहेत. सर्वांना अटक होईल', असे स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, walmik karad
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला 24 तास पूर्ण होण्याआधीच अविनाश बारगळांची बदली, आता 'हे' असणार बीडचे नवे पोलिस अधीक्षक

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात आम्ही मागास भागात परिवर्तन केले आहे. पुढील रोडमॅप देखील आम्ही विधानसभेत मांडला आहे. महाराष्ट्रातील मागास भागावर आमचा फोकस आहे. नदीजोड आणि सिंचनावर प्रकल्पांवर आमचा भर असणार आहे.

Devendra Fadnavis, walmik karad
Sharad Pawar Visit Massajog : दहशतीतून बाहेर पडा, सगळे मिळून परिस्थितीला तोंड देऊ..

त्यासोबतच कापसाचा बोनस आपण जाहीर केला आहे. सोयाबीनची खरेदी हमीभावाने रेकॉर्डब्रेक खरेदी आपण केली आहे. विदर्भ मराठवाड्यातील पिकांना न्याय देण्याचे काम आपल्या सरकारने केले असून येत्या काळात सुरु असलेल्या कॊणत्याच योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, walmik karad
Sharad Pawar : 'पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही'; मयत सूर्यवंशी कुटुंबियांच्या न्यायासाठी पवारांचा 'मोठा' निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com