Sitaram Yechury : सीताराम येचुरींची प्रकृती पुन्हा बिघडली; दिल्ली 'AIIMS'मध्ये व्हेंटिलेटरवर!

Sitaram Yechury on ventilator at AIIMS : सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना तेथील आयसीयू मध्ये नेण्यात आले होते.
Sitaram Yechuri
Sitaram Yechuri Sarkarnama
Published on
Updated on

Sitaram Yechury health Update : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. यामुळे त्यांना दिल्लीती 'AIIMS'मध्ये व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या फुफ्फ्सात समस्या असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. आता एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

७७ वर्षीय माकप नेते सीताराम येचुरी(Sitaram Yechuri) यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना तेथील आयसीयू मध्ये नेण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी अचानक तब्येत पुन्हा एकदा खालावली.

Sitaram Yechuri
Rahul Gandhi : राहुल गांधी गोंधळलेले की अतिशय चतुर?

सीताराम येचुरी ऑगस्ट महिन्यांमध्ये न्युमोनियासारख्या संसर्गाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, एम्सच्या डॉक्टारांनी त्यांच्या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. येचुरी यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून एम्सच्या डॉक्टारांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

Sitaram Yechuri
Arvind Kejriwal : ...अखेर केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून!

पक्षाने दिली माहिती -

मागील काही दिवसांपूर्वी (31 ऑगस्ट) भारतीय कम्युनिस्ट पार्टीने(मार्क्सवादी) एक परिपत्रक काढून सांगितले होते की, सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. पक्षाने सांगितले होते की, त्यांच्या श्वसन संसर्गावर उपचार सुरू आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com