Arvind Kejriwal, Supreme Court
Arvind Kejriwal, Supreme CourtSarkarnama

Arvind Kejriwal : ...अखेर केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून!

Supreme Court on Arvind Kejriwal Petition : सुनावणीवेळी केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस वी राजू उपस्थित होते.
Published on

Arvind Kejriwal Bail Petition Update : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज (गुरुवारी) सुनावणी झाली. यादरम्यान सीबीआय आणि केजरीवाल यांच्याकडून आपले म्हणणे मांडले गेले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

अरविंद केजरीवाल यांना आधीच EDने अटक केली होती. परंतु त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर CBIने त्यांना तुरुंगातूनच अटक केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने प्रकरणी सुनावणी केली. या दरम्यान केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस वी राजू उपस्थित होते.

Arvind Kejriwal, Supreme Court
Arvind Kejriwal News : 'सीबीआय'चा केजरीवालांवर गंभीर आरोप; गुन्हेगारी कटातून मिळालेला पैसा निवडणुकीवर...

जामिनासाठी दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचे वकील सिंघवी यांनी म्हटले की, आमची पहिली याचिका अटकेला आव्हान देणारी आहे. तर दुसरी याचिका जामिनासाठी आहे. त्यांनी हेही म्हटले की केजरीवालांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, केवळ जबाब आहे.

Arvind Kejriwal, Supreme Court
Rahul Gandhi : राहुल गांधी गोंधळलेले की अतिशय चतुर?

केजरीवालांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यांना दहा दिवसांच्या चौकशीनंतर एक एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवले होते. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांसाठी १० मे रोजी सोडण्यात आले होते. यानंतर दोन दोन जून रोजी केजरीवालांना तिहार तुरुंगात हजर व्हावे लागले होते. त्यानंतर आज ५ सप्टेंबर रोजी केजरीवालांच्या याचिकेवर सुनावणी झाली. परंतु निर्णय राखून ठेवला गेला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com