Revanth Reddy Vs KCR News : तेलंगणात रेवंत रेड्डींकडून 'केसीआर'यांना मोठा धक्का; 'BRS'च्या सहा आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

BRS Six MLC join Congress News : मागीलवर्षी विधानसभेतील पराभवापासून 'बीआरएस'मध्ये आमदार, खासदारांचे राजीनामा सत्र सुरूच आहे ; विधानपरिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे.
BRS Six  MLC join Congress
BRS Six MLC join CongressSarkarnama

Telangana Congress Vs BRS politics News : तेलंगणात माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांना मोठा झटका बसला आहे. गुरुवारी त्यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाच्या विधानपरिषदेतील सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत विद्यमान मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे आमदार सातत्याने पक्ष सोडून जाताना दिसत आहेत.

काँग्रेसमध्ये(Congress) प्रवेश केलेल्या सहा आमदारांमध्ये दांडे विठ्ठल, भानुप्रसाद राव, एम एस प्रभाकर, बोग्गरापु दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवाराजू सरैया यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणातील एआयसीसी प्रभारी दीपा दासमुंशी आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

BRS Six  MLC join Congress
Telangana News : तेलंगणा सरकारचा पहिल्याच कॅबिनेटमध्ये 'षटकार' ; '६-गॅरंटी' ची पूर्तता...

बीआरएस आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर केटी रामराव यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी राहुल गांधींवर(Rahul Gandhi) निशाणा साधला. केटीआर म्हणाले, बीआरएस खासदार केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीनामा दिला. त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे.

परंतु त्या बीआरएस आमदारांचे काय ज्यांनी हरल्यानंतरही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्या अर्धाडझन आमदारांचं काय ज्यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल तुम्ही अशाचप्रकारे संविधान कायम राखणार का? जर बीआरएस आमदारांना राजीनामे द्यायला नाही लावू शकत, तर देशाला तुमच्यावर कसा विश्वास बसेल?

तेलगंणा विधान परिषदेत बीआरएसकडे 25 आमदार आणि काँग्रेसकडे पाच आहेत. एकूण 40 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात दोन जागा रिक्त आहेत. याशिवाय चार नामनिर्देशित एमएलसी आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, भाजप, पीआरटीयूचा प्रत्येकी एक आणि एक अपक्ष सदस्य आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यानंतर या बीआरएस आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे आता विधानपरिषदेतील काँग्रेसचं संख्याबळ वाढून दहा झालं आहे.

BRS Six  MLC join Congress
Amit Shah News : बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेशात किती जागा जिंकणार? भाजपच्या चाणक्यांनी सांगितला आकडा

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत 119 जागांपैकी बीआरएसला केवळ 39 जागांवरच विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसने मुसंडी मारत 64 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय सिकंदराबाद छावणी मतदारसंघातील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी लागलेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने विजय मिळवला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com