Telangana News : तेलंगणा सरकारने झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत 'षटकार' मारत मोठी घोषणा केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या ६ - गॅरंटी (सहा हमी योजना) अंतर्गत 'महालक्ष्मी' योजनेतून सर्व वयोगटातील मुली, महिला आणि तृतीयपंथी यांना तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
तेलंगणा Telangana राज्यात काँग्रेसने Congress आपली सत्ता मिळवली आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदी ए. रेवंथ रेड्डी यांची वर्णी लागली. सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत प्रचारादरम्यान दिलेल्या ६ - गॅरंटी (सहा हमी योजना) अंतर्गत योजनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली. यामध्ये 'महालक्ष्मी' योजनेतून सर्व वयोगटातील मुली, महिला आणि तृतीयपंथी यांना तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
त्याबाबतचा आदेश सरकारने जारी केला आहे. तेलंगणा राज्याच्या हद्दीत 9 डिसेंबर दुपारपासून ग्रामीण सेवेत आणि एक्स्प्रेस बसने कुठेही प्रवास करू शकतात. तसेच काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजीव आरोग्यश्री’ आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 'राजीव आरोग्यश्री' अंतर्गत 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहेत.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ए. रेवंथ रेड्डी A. Revant Reddi यांनी शुक्रवारी त्यांच्या कॅम्प ऑफिस-सह-सरकारी निवासस्थानी 'जनता दरबार' आयोजित केला आणि सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. ज्योतिराव फुले लोक भवन येथे झालेल्या जनता दरबारास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग व्यक्तींकडून निवेदन घेण्यास प्राधान्य दिले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
काय आहे काँग्रेसच्या ६-गॅरंटी (सहा हमी योजना)..
काँग्रेसच्या ६-गॅरंटी (सहा हमी योजना)मध्ये महालक्ष्मी योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जाणार आहेत.
याशिवाय महिला, तृतीयपंथी यांना मोफत प्रवास आणि ५०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. इंदिराम्मा इंदू गॅरंटी अंतर्गत, राज्यातील ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांना स्वतःचे कायमचे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय गृह ज्योती योजनेंतर्गत सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सहा हमी अंतर्गत युवा विकास योजनेचा उल्लेख केला आहे, ज्याअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांची विद्या भरोसा कार्ड दिले जातील आणि त्यांना कोचिंग फी भरण्यास मदत केली जाईल. चेयुथा गॅरंटी अंतर्गत, तेलंगणातील वृद्धांना ४००० रुपयांचा मासिक विमा आणि १० लाख रुपयांचा राजीव आरोग्यश्री विमा प्रदान केला जाईल.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.