Amit Shah News : बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेशात किती जागा जिंकणार? भाजपच्या चाणक्यांनी सांगितला आकडा

Amit Shah On Lok Sabha Election : 2014 मध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळेल, या नाऱ्यासह निवडणूक लढत होती. दिल्लीतील राजकीय विश्लेषकांनी बहुमत मिळणार नसल्याचा दावा केला होता. पण...
Amit Shah
Amit Shahsarkaranama

BJP News, 29 May : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजप 'अबकी बार 400 पार'च्या नाऱ्यासह मैदानात उतरली आहे. पण, भाजपला 300 च्या वरती जागा मिळणार नाहीत, असा दावा विरोधकांकडून केला जातोय.

त्यासह उत्तरेकडील राज्यांसह पश्चिम बंगाल आणि ओडिशात भाजपला फटका बसण्याची शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे. पण, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात भाजपला किती जागा मिळतील? याबाबत भाजपचे चाणक्य आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"2014 मध्ये भाजप नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळेल, या नाऱ्यासह निवडणूक लढत होती. दिल्लीतील राजकीय विश्लेषकांनी बहुमत मिळणार नसल्याचा दावा केला होता. पण, 2014 मध्ये आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं.

2019 मध्ये 300 च्या वर जागा निवडून येणार असल्याची घोषणा आम्ही केली होती. तेव्हा हे अशक्य असल्याचं लोक सांगत होते. आताही लोक हेच बोलत आहेत," असं अमित शाह यांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून भाजपला खूप अपेक्षा आहेत. या राज्यांतून भाजपला किती जागा मिळतील? या प्रश्नावर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले, "बंगालमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळतील.

तिथे 24 ते 30 जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील. ओडिशात लोकसभेच्या 17 आणि विधानसभेच्या 75 जागा जिंकणं आमचं लक्ष्य आहे. तेलंगणात 10 च्या आसपास जागा आम्ही जिंकू. आंध्र प्रदेशात युतीचं सरकार आम्ही बनवत आहोत. त्यासह लोकसभेला 'एनडीए'च्या जास्त जागा निवडून येतील."

Amit Shah
Amit Shah News : गोलमाल सरकार! जगन्नाथ पुरीतील रत्न भांडाराच्या हरवलेल्या चावीने तापवलं राजकारण

"पूर्वेकडील अर्थात पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशा या राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारी घेईल. तर, दक्षिणेतील पाच राज्य म्हणजे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूत भाजपचे सर्वांधिक उमेदवार निवडून येत आहेत," अशी भविष्यवाणी अमित शाहांनी केली आहे.

ओडिशात यंदा बदल होणार असल्याचा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. "देशाच्या 25 वर्षांचा इतिहास लिहायला घेतल्यावर त्यात ओडिशातील गायब वर्षे म्हणून समजली जातील. नवीन पटनायक यांच्या कार्यकाळात ओडिशात विकास झाला नाही. 25 वर्षांत देशातील अनेक राज्यात पायभूत सुविधा, शिक्षण, आर्थिक, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात मोठा विकास झाला आहे," असं अमित शाहांनी सांगितलं.

Amit Shah
Narendra Modi News : ना उत्तर प्रदेश, ना महाराष्ट्र, ना गुजरात; 'या' राज्यात भाजपला मिळणार मोठं यश; मोदींची भविष्यवाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com