इंधन दरवाढीवरुन विमानातच स्मृती इराणींसोबत कॉंग्रेसच्या नेत्या भिडल्या ; व्हिडिओ व्हायरल

इंधन दरवाढीमुळं दोन्ही नेत्या विमानात आमने-सामने आल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
smriti irani
smriti iranisarkarnama

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत.

वाढत्या महागाईवरूनच भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani)यांना काँग्रेसच्या (congress) महिला नेत्याने थेट विमानातच प्रश्न विचारला. यावरुन वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्या इंधन दरवाढीमुळं विमानात आमने-सामने आल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅाग्रेसच्या महिला नेत्याने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईवरून आंदोलन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना आजच्या महागाईबाबत उत्तर देण्याचे कसे टाळले, यावरुन सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.

ही घटना दिल्ली-गुवाहाटी विमान प्रवासात घडली. १ मिनिटं आणि ११ सेंकदांचा हा व्हिडीओ आहे. दोन्ही नेत्यांमधील हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

smriti irani
तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा ; राऊताचं नवं टि्वट

काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा (netta dsouza)आणि स्मृती इराणी या एकाच विमानातून प्रवास करीत असताना हा प्रकार घडला. डिसुझा यांनी इराणी यांना स्वयंपाकाच्या महागलेल्या गॅसदरवाढीवरुन प्रश्न विचारला. यावेळी दोघा नेत्यामध्ये शाब्दीक चकमक झाली.

स्मृती इराणी यांनी उत्तर देण्याचे टाळले. '''आपण आधी लोकांना उतरण्यासाठी रस्ता द्या. यामुळे लोकांना त्रास होतोय,' असे उत्तर इराणी यांनी दिले. त्यावर 'हा लोकांचाच प्रश्न आहे,' असे डिसुझा म्हणाल्या.

smriti irani
पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही : परबांचा निर्णय

दरम्यान विमानातील एक महिला प्रवासी स्मृती इराणींना ''हॅप्पी बिहू'' म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याला इराणी यांनीही प्रतिसाद दिला. हाच धागा पुढे घेऊन डिसुझा इराणींना म्हणाल्या, 'हॅप्पी बिहू गॅस शिवाय.., स्टोव्ह शिवाय..?' यावर इराणी चिडल्या, त्या म्हणाल्या, ''तुम्ही खोटं बोलत आहात. चुकीचं बोलत आहात.''

डिसुझांनी त्यांच्या परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करत आहे. डिसुझा या घटनेचे शुटिंग करत असल्याचं बघून स्मृती इराणीही मोबाईल काढून शुटिंग करत असल्याचं दिसत आहे. त्यावर डिसुझा इराणींना म्हणतात, 'तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात आणि लोकांना तुमच्याकडून उत्तर हवंय.' त्याचवेळी इराणी म्हणाल्या, ''कोरोना काळात लोकांना मोफत लस दिली गेली,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com