तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा ; राऊताचं नवं टि्वट

‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे है'
Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : ''सेव्ह विक्रांतच्या नावाखाली भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)कोट्यवधी रुपये जमा केले. या कटाचे प्रमुख सूत्रधार देशद्रोही सोमय्याच आहेत,'' असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. सोमय्या आणि राऊत यांचा वाद रंगला आहे.

संजय राऊत यांनी आज टि्वट करुन पुन्हा सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok.भाग सोमय्या भाग’,असे राऊत यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. " तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा? मुझे रहजनोसे गीला तो हैं, पर तेरी रहबरी का सवाल हैं.." असे राऊत यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही : परबांचा निर्णय

''किरीट सोमय्या त्यांच्या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत आहेत, तर नील सोमय्या हे देखील त्यांच्या कामासाठी बाहेर असल्याने ते आज हजर राहू शकत नाहीत. बुधवारनंतर सोमय्या हजर राहण्यास तयार आहेत, कायदेशीर लढाई कायदेशीर रित्याच लढवू.’असे सोमय्यांच्या वकीलांनी सांगितले आहे. सोमय्यांच्या वकिलाकडून अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला असून, येत्या ११ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी अभियान सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही अशी तक्रार फिर्यादी बबन भोसले यांनी दाखल केली होती.

Sanjay Raut, Kirit Somaiya
नार्वेकरांसमोरच शिवसेनेच्या आमदारानं केलं भावी मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर..

'आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी जमा केलेला निधी राज्यपाल भवनाला दिला का नाही, हे सोमय्यांनी सांगावे,' यावर राऊत आग्रही आहेत. तर दुसरीकडे सोमय्यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण त्याबाबतचे पुरावे द्यावे, असे सोमय्यांनी माध्यमांना सांगितले आहे. ''निधी जमा करा, मग मी पुरावे देतो,'' असे राऊतांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com