पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही : परबांचा निर्णय

शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
Anil Parab, Sharad Pawar
Anil Parab, Sharad Pawarsarkarnama

मुंबई : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike)दोन दिवसापूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली आहे. तर १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल परब म्हणाले, ''येत्या 22 तारखेंपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही.

Anil Parab, Sharad Pawar
नार्वेकरांसमोरच शिवसेनेच्या आमदारानं केलं भावी मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर..

परब म्हणाले, ''22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे,''

सिल्वर ओक येथील हल्ल्याप्रकरणी काल दुपारी किल्ला कोर्टात सदावर्ते यांच्यावर यातील ११० आरोपींना हजर करण्यात आले. सदावर्ते यांच्यावर आरोप गंभीर असून त्यांना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली. सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याने हा हल्ला झाला असल्याचे घरत यांनी सांगितले. सर्वच आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी घरत यांनी यावेळी केली होती. सदावर्ते यांनी दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचा निर्णय यावेळी न्यायालयाने दिला.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shabhuraj desai) यांनी दिली. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासुद्धा सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत आता पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी तैनात असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com