हिंसाचार उसळला! ईव्हीएमची पळवापळवी अन् गोळीबारात भाजप कार्यकर्ता ठार

मतदानावेळी काही जणांनी पोलिसांना मारहाण करुन ईव्हीएम पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
Manipur Election
Manipur ElectionSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानात हिंसाचार उफाळला आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. ईव्हीएमची पळवापळवीसह भाजपचा कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यातील एकूण 60 पैकी 22 मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत 68 टक्के मतदान झाले आहे.

मणिपूरमधील (Manipur) मतदानाचा हा शेवटचा टप्पा असून, यात हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. कॅरोंग येथे एका मतदान केंद्रावर पोलिसांना मारहाण करून ईव्हीएम घेऊन काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. या वेळी सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला. यात एका व्यक्ती ठार झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत थौबल जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता ठार झाला आहे. काही भाजप (BJP) कार्यकर्ते काल (ता.4) एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यातून काँग्रेस कार्यकर्त्याने गोळीबार केला. या गोळीबारात भाजपचा एका कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज त्याचा मृत्यू झाला.

Manipur Election
अडचणीत येताच नारायणे राणेंनी मुलाला सोबत घेऊन थेट पोलीस ठाणं गाठलं..

मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. यातील पहिला टप्पा 28 फेब्रुवारीला झाला. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला होता. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान, शहांनी भाजपचे उमेदवार श्यामसिंह यांच्या थौबल येथील निवासस्थानी मेजवानीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यासमवेत मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेसुद्धा होते.

Manipur Election
राजकारण तापलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या भावासह 30 पदाधिकाऱ्यांना पक्षातून डच्चू

अमित शहा झाले होते ट्रोल

दरम्यान, अमित शहांच्या मणिपूरमधील या मेजवानीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. देशातील मुले मरताहेत आणि यांना खाण्यातून वेळ मिळेना, अशी टीका एका नेटिझनने केली आहे. भारतीय युक्रेनमध्ये मरत आहेत आणि आपले सरकार आणि अमित शहा मेजवानी खाण्यात गुंग आहेत. यांचे सगळे लक्ष मणिपूरच्या निवडणुकीवर आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली होती. विदेशात आपली मुले शिकायला जाणे हे आपल्या देशाच्या कमजोरीचे लक्षण आहे. सत्तालोभी सरकार आपल्या देशात चांगली शिक्षण व्यवस्था देऊ शकले नाही. शिक्षेचे महत्व गरीब व्यक्तीला कळते. पण प्रचार आणि खोट्याच्या जोरावर खुर्चीवर बसलेल्या अशिक्षित नेत्यांना शिक्षणाचे महत्व काय कळणार, अशी खंतही एका नेटिझनने व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com